धक्कादायक ! वसतीगृहातील मुलींना कपडे पोलिसांनीच काढून नृत्य करायला लावले

207
rape

जळगाव : येथील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात काही पोलीस कर्मचारी व इतर बाहेरच्या पुरुषांकडून मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

सामाजिक संघटनांनी मंगळवारी या प्रकरणाला वाचा फोडून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यात संबंधित कृत्याचा व्हिडिओही सादर केला. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी याची तातडीने दखल घेऊन चौकशी करण्याचे आश्वासन दिले.

महिला व बालकल्याण विभागामार्फत गणेश कॉलनीतील वसतिगृहात निराधार व अन्याय, अत्याचार झालेल्या महिला व मुलींच्या निवारा-भोजनाची व्यवस्था केली जाते. या वसतिगृहात गैरप्रकार घडत असल्याच्या तक्रारी होत्या.

जननायक फाउंडेशनचे अध्यक्ष फिरोज पिंजारी, फरीद खान, मंगला सोनवणे आदींनी मंगळवारी दुपारी वसतिगृह गाठून महिला व मुलींना भेटून माहिती जाणून घेतली असता १ मार्च रोजी काही पोलीस कर्मचारी व बाहेरील पुरुष यांनी मुलींना कपडे काढून जबरदस्तीने नृत्य करायला भाग पाडले असल्याचे सांगितले.

महिला व बालकल्याण विभागामार्फत गणेश कॉलनीतील वसतिगृहात निराधार व अन्याय, अत्याचार झालेल्या महिला व मुलींच्या निवारा-भोजनाची व्यवस्था केली जाते. या वसतिगृहात गैरप्रकार घडत असल्याच्या तक्रारी होत्या.

तेव्हा प्रत्यक्ष पाहणीसाठी गेल्यानंतर अनेक धक्कादायक गोष्टी निदर्शनास आल्याचे सांगितले जात आहे. या गैरप्रकारांना ज्या मुली नकार देतात, त्यांना मारहाण करण्याची धमकी दिली जाते.

सामाजिक कार्यकर्त्यांना या वादग्रस्त केंद्रात पाहूणीसाठी आतमध्ये प्रवेश देण्यात आला नव्हता, मुली आतूनच खिडकीद्वारे आपल्यावर बेतलेले प्रसंग आणि अत्याचार ओरडून सांगत होत्या. या मुली बोलण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांनाही संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून मज्जाव केला जात होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here