रांची : झारखंडच्या पलामू जिल्ह्यात एक भयानक घटना घडली. पलामू जिल्ह्यातील लालीमातीच्या जंगलात बुधवारी (दि.9) एका 16 वर्षाच्या मुलीचा मृतदेह झाडाला लटकलेला आढळला.
अल्पवयीन मुलीचे हत्येनंतर डोळे फुटलेले आढळून आले आहे. हत्येनंतर तिचा मृतदेह झाडावर टांगला गेला, अशी माहिती पोलिसांनी दिली असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी स्थानिक भाजपा नेत्याची मुलगी होती. पांकी पोलिस स्टेशन परिसरात बुधवार या खेड्यात आपल्या कुटूंबियांसह राहत होती आणि दहावीत शिकत होती.
बुधवारी सायंकाळी मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. तिला पाच भावंडे आहेत आणि ती सर्वात मोठी आहे.
तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून एक मोबाइल फोन हस्तगत केला आणि त्याच्या कॉल डिटेलच्या आधारे आरोपीला अटक केली. प्रदीपकुमारसिंग धानुक (वय 23) असे त्याचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की प्रदीप कुमार विवाहित होता आणि त्याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केला.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी 7 जून रोजी सकाळी 10 नंतर बेपत्ता झाली होती. ती बेपत्ता झाल्याची तक्रार मुलीच्या कुटुंबियांनी 8 जून रोजी केली होती.
पोलिसांनी मुलीचा शोध सुरू केला आणि तिचा मृतदेह झाडाला लटकलेला आढळला. मृतदेह कापडात गुंडाळलेला होता आणि झाडाला टांगला होता. तसेच तिचा उजवा डोळा फुटलेला होता. पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतरच सविस्तर माहिती मिळेल, अशी माहिती पांकी पोलिस स्टेशनचे एसआय अशोक कुमार यांनी दिली.
हत्येपूर्वी आरोपींनी अल्पवयीन मुलीला मारहाण केली. अल्पवयीन मुलगी बेपत्ता होण्यापूर्वी काही दिवसांपूर्वी आरोपी व पीडितेच्या कुटुंबामध्ये भांडण झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक कारण हेच असावे असे म्हटले आहे. झारखंड भाजपाचे प्रवक्ते प्रतुल सहदेव यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.
हे वाचा :
-
जितिन प्रसाद यांनी प्रियंका गांधींमुळे काँग्रेसला सोडले, उत्तर प्रदेश काँग्रेसला मोठा फटका !
-
घटस्फोटाचा प्रश्नच नाही, ते लग्न नव्हे तर लिव्ह इन रिलेशनशिप होते : खासदार नुसरत जहां
-
Covid Update News : कोवॅक्सिन लस घेतलेल्यांसाठी गुड न्यूज!