धक्कादायक : मामी भाच्याच्या प्रेमात पडली, दोघांनी लग्न केले आणि लग्नाचा व्हिडिओ व्हायरल केला !

480
Shocking: Mami fell in love with her niece two got married and wedding video went viral!

पटना : प्रेम आंधळे असते हे खरेच आहे. कारण जी व्यक्ती प्रेमात पडते तिला वय, जात, नाते किंवा समाज यांचे भान उरत नाही.

नाती आणि माणुसकीला गालबोट लावणारी घटना समोर आली आहे. एक तरुण चक्क मामीच्या प्रेमात पडला आणि तिच्या प्रेमात एवढे बुडाला की त्याने सर्व मर्यादा ओलांडून मामीसोबतच लग्न करण्याचा निश्चय केला.

मामी देखील त्याच्या प्रेमात एवढी वेडी झाली कि तिनेही नाते, सामाजिक बंधन, वय आणि संसार व पतीचा कोणताही विचार न करता एकमेकांशी लग्न करण्याचे ठरविले.

बरं, ते दोघे फक्त लग्न करूनच थांबले नाहीत, तर त्यांनी लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आणि तो व्हीडीओ पाहून सर्वांनाच धक्का बसला.

बिहारच्या जमुई गावात या जोडप्याने एकमेकांच्या गळ्यात हार घालून आणि अग्नीभोवती सात फेरे मारून लग्न केले. व्हिडिओमध्ये पुतण्या मामीच्या भांगात कुंकू भरत आहेत आणि मामी आपल्या नवीन नवऱ्याला वाकून नमस्कार करताना दिसत आहे. जमुईमध्ये व्हिडिओ व्हायरल झाला आणि गावातील घरात घरोघरी चर्चा पसरली.

मामी-भाच्याचं सूत असे जुळले

22 वर्षीय चंदन कुमार मुंबईत रिक्षा चालवतो. मामा आणि मामीसुद्धा कामासाठी मुंबईतच रहात होते. त्यावेळी चंदन कुमार मामाच्या घरी राहत होता.

त्याच वेळी त्याचे आणि मामीचे संबंध आले, त्यानंतर ते हळूहळू एकमेकांच्या प्रेमात पडले. लॉकडाउन सुरू झाल्यानंतर हे तिघेही बिहारमधील आपल्या गावी परतले. तिथेही चंदन मामाच्या घरी रहात होता.

एकदा मामाने या दोघांना नको त्या अवस्थेत पाहिले आणि त्यांना धक्काचं बसला, पण त्यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली आणि गावात बोभाटा नको म्हणून मामाने सबुरीची भूमिका घेतली.

तथापि, मामाने कधी कल्पनाही केली नव्हती की आपली पत्नी आपल्याच भाच्यासोब्त लग्न करेल आणि दोघांचे लग्न झाल्याचा व्हिडिओ संपूर्ण गावात व्हायरल होईल.

लग्नानंतर मुंबई गाठली

लग्नानंतर मामी भाच्याचे नाते बदलले आणि नवविवाहित जोडपे थेट मुंबईला निघून गेले असावेत अशी गावात चर्चा आहे. त्यांनी घर सोडून जाताना कोठे जात आहेत याची माहिती लपवून ठेवली आहे.

त्यांनी सोशल मीडियावर फक्त लग्नाचा व्हिडिओ शेअर केला. त्यासोबतच त्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमुळे या अनोख्या लग्नाची चर्चा केवळ एका खेड्यातच नव्हे तर देशभर पसरली.

हे देखील वाचा 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here