धक्कादायक | पत्नीचे अर्धनग्न फोटो स्टेट‌सला ठेवले; पतीवर गुन्हा दाखल !

164

पत्नीचे अर्धनग्न अवस्थेतील काढलेले फोटो पतीनेच तिच्या चुलत्याला पाठवून स्वतःच्या व्हाॅट्सअपवर स्टेटस ठेवल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी केज पोलिसांत महिलेच्या तक्रारीवरून त्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

केज तालुक्यातील माहेर असलेल्या २२ वर्षीय विवाहितेस उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात दिले होते. ती सासरी नांदत असताना या महिलेच्या पतीने तिचे अर्धनग्न अवस्थेत फोटो काढले होते. 

दरम्यान, आता पती-पत्नीत बिनसल्यामुळे ही विवाहित माहेरी वास्तव्यास आहे. दरम्यान, एकत्रित राहत असताना पतीने तिचे काही अर्धनग्न फोटो काढले होते. २४ डिसेंबर रोजी दुपारी १.४९ वाजेच्या सुमारास पतीने या महिलेच्या चुलत्याच्या व्हाॅट्सअपवर हा फोटो पाठवला.
 दुसऱ्या दिवशी २५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्याने हा फोटो त्याच्या व्हाॅट्सअपवर स्टेटस ही ठेवले. हा प्रकार निदर्शनास येताच पीडित महिलच्या फिर्यादीवरून तिच्या पतीविरुद्ध केज पोलिसांत विनयभंग व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here