नागपूर: नागपुरात 10 वर्षांपासून शस्त्रास्त्रांसह राहणाऱ्या एका अफगाणी नागरिकाचा फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो व्हायरल होताच नागपुरात खळबळ उडाली आहे.
अफगाण नागरिक हा पर्यटक व्हिसावर भारतात आला होता पण त्याचा व्हिसा संपल्यानंतरही तो बेकायदेशीरपणे भारतात वास्तव्यास होता.
नागपूर पोलिसांनी दोन महिन्यांपूर्वी त्याला गुप्त माहिती मिळाल्यानंतर अटक केली होती. त्याची कसून चौकशी करण्यात आली होती.
मात्र, त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता किंवा तो कोणत्याही बेकायदेशीर कारवायांमध्ये सहभागी नसल्याचे पोलिस तपासात आढळून आले.
त्यानंतर पोलिसांनी त्याला अफगाणिस्तानला परत पाठवले. मात्र, आता नागपूर आणि अफगाणिस्तानमधील शस्त्रासह त्याचा फोटो व्हायरल झाला आहे.
दरम्यान, अफगाणिस्तानमधील वादग्रस्त परिस्थितीनंतर नागपुरात अफगाणी नागरिकाचा शस्त्रासह फोटो असणे अत्यंत धोकादायक असल्याचे बोलले जात आहे.
17 ऑगस्ट रोजी तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतला. तेव्हापासून सर्व देश हाय अलर्टवर आहेत. शिवाय, तेथील नागरिक देश सोडण्याचा प्रयत्न करीत आहेत.
अफगाणी नागरिक देशात कोणत्या भागात राहतात आणि त्यांची संख्या किती याबद्दल सुरक्षा यंत्रणा कसून तपास करीत आहे.
हे देखील वाचा :
- महाराष्ट्र भाजपा नेते दिल्लीत दाखल : देवेंद्र फडणवीस गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार
- चिंताजनक : कोरोनाची तिसरी लाट येणारच; मुख्यमंत्र्यांचे सल्लागार म्हैसेकर यांचा इशारा
- अबू आझमी समर्थकांनी बर्थ डे रॅली काढली अन् तलवार बाळगली | आमदार अबू आझमींवर गुन्हा दाखल