धक्कादायक | पुण्यात पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलीवर बलात्कार

174

संपूर्ण समाजाच्या सुरक्षेची काळजी घेणाऱ्या पोलिसांच्या मुलीचेच जर अपहरण होऊन बलात्कार होत असेल तर समाज म्हणून आपण कसे सुरक्षित राहणार हा प्रश्न निर्माण होतो.

अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे, पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलीचे अपहरण करून तिला गुंगीच्या औषधाने अर्धवट बेशुद्ध करून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मुलीचे अपहरण 21 डिसेंबरला रात्री 8 च्या सुमारास वडगाव शेरी परिसरातून करण्यात आले होते. त्यानंतर तिला नेवासा (नगर ) परिसरात नेऊन बलात्कार केला.

सागर मोहन सातव ( वय 28) याच्यासह त्याच्या दोन साथीदाराविरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी एका पोलीस शिपायाची मुलगी आहे. तिची परिसरातील एका तरुणाशी मैत्री होती.

21 डिसेंबरला रात्री आठच्या सुमारास तरुणी रस्त्याने एकटी जात असताना सागर दोन साथीदारांसह मोटारीतून तेथे आला.

त्याने तरुणीला अडवून मी तुझ्यासोबत लग्न करतो, तू माझ्या गाडीत बसली नाही तर मी जीवाचे बरेवाईट करून घेईन. असे म्हणत त्याने विषारी औषधाची बाटली तरुणीला दाखवली.

त्यामुळे घाबरून तरुणी त्यांच्या गाडीत बसली. त्यानंतर त्यांनी तरुणीला गुंगीच्या औषधाने अर्धवट बेशुद्ध केले. तिचे हातपाय बांधून नेवासा ( नगरला) नेले. त्याठिकाणी तरुणीला नेऊन बलात्कार केला.

त्यानंतर तिघांनी तिला पुन्हा गाडीतून पुण्यात आणून सोडून दिले. या घटनेने तरुणीला धक्का बसला असून खळबळ उडाली आहे. चंदन नगर पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here