अहमदपूर येथील इंदिरा नगर येथील ६० वर्षीय महिलेवर बलात्कार करून जिवे मारण्याची धमकी दिल्याने ६० वर्षीय महिलेने वाकी नदीपात्रात आत्महत्या केली.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, किशन रेणुकादास उगाडे (वय ४०, रा. इंदिरा नगर, अहमदपूर) याने फिर्यादीच्या ६० वर्षीय सासूवर सोमवारी (दि.२८) रात्री ११.३० ते मंगळवारी सकाळी ११.३० च्या दरम्यान बलात्कार केला व मारहाण करुन घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.
पिडितेने अपमान सहन न झाल्याने शहराजवळील वाकी नदीपात्रात आपली जीवनयात्रा संपविली. फिर्यादीच्या जबाबावरुन मंगळवारी (दि.२९) दुपारी अहमदपूर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला हे करीत आहेत.