शिक्षक आणि विद्यार्थी हे नाते संपूर्ण जगात पवित्र असे नाते समजले जाते. पण कधी-कधी कुणा एकाच्या चुकीमुळे या नात्यालाच काळीमा फासला जातो.
सामान्य माणूस चक्रावून जावा, आणि कधी कोण काय करेल याचा अंदाज येऊ नये अशी धक्कादायक घटना जालंधरमधे घडल्याचे समोर आले आहे.
एका शिक्षिकेने आपल्या विद्यार्थ्यावर जबरदस्ती करीत लग्न केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली आहे.
तिच्या पत्रिकेतील ‘मंगळा’वर मात करण्यासाठी आपल्या १३ वर्षाच्या विद्यार्थ्याशी लग्न केले. जालंधरच्या बस्ती बावा खेल भागात ही घटना घडली आहे. मांगलिक दोषामुळे तिचे लग्न होत नसल्यामुळे तिचे कुटुंब चिंतीत असल्याचे या महिलेने पोलिसांना सांगितले.
या महिला शिक्षिकेला मंगळ दोष होता. तिला कुणीतरी तांत्रिकाने असे ‘लग्न’ केले तर मंगळ दोष दूर होऊन लग्न होईल. तेव्हा तिने मंगळ दोष दूर होईल म्हणून ‘हे’ पाऊल उचलले.
अल्पवयीन मुलाच्या कुटुंबाने शिक्षिकेविषयी पोलिसात तक्रार केली आहे. या तक्रारीनुसार, महिला शिक्षिकेने विद्यार्थ्याला क्लासेसचे आमिष दाखवून आपल्या घरात थांबवून ठेवले आणि त्याच्यासोबत जबरदस्तीने लग्न केले.
मात्र, हे लग्न केवळ प्रतिकात्मक होते. विद्यार्थ्याच्या घरीच आर्थिक परिस्थिती चांगली नाही. शिक्षिकेने विद्यार्थ्याला अभ्यास घेण्यासाठी आपल्या घरी ठेवण्याचे सांगितले होते. त्यामुळे विद्यार्थ्याच्या घरचेही यासाठी तयार झाले.
शिक्षक आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांनी जबरदस्तीने हळदी-मेहंदी सोहळा आणि ‘सुहागरात’ विवाह विधी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. नंतर शिक्षिकेला तिच्या बांगड्या फोडून विधवा घोषित केले. सुचवलेले विधी पूर्ण करण्यासाठी कुटुंबीयांनी शोकसभेचे आयोजन देखील केले होते.
पत्रिकेतील ‘मंगळ’ दूर करण्यासाठी शिक्षिकेने केले १३ वर्षाच्या विद्यार्थ्याशी जबरदस्तीने लग्न! हळदी-मेहंदी-सुहागरात आणि शेवटी केला ‘विधवा विधी’
लग्नाचे सर्व विधी संपन्न झाल्यावर विद्यार्थ्याला घरी पाठवण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कुटुंबाने तक्रारीत म्हटले की त्याच्याकडून शिक्षिकेने आणि तिच्या घरच्यांनी भरपूर कामे देखील करवून घेतली. घरी आल्यावर या अल्पवयीन विद्यार्थ्याने हा सर्व घडलेला प्रकार सांगितला.
शिक्षिकेनं तक्रारीनंतर हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विद्यार्थ्याच्या कुटुंबाने तक्रार मागेही घेतली. मात्र हे प्रकरण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना समजले तेव्हा त्यांनी या घडलेल्या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले.
या घडलेल्या प्रकाराविषयी बोलताना, जालंधरचे डीएसपी गुरमीत सिंह यांनी मान्य केले की, अशाप्रकारचे लग्न झाले आहे आणि याची माहिती पोलिसांना आहे.
ते म्हणाले की, घटनेची चौकशी केली जात आहे. महिलेवर मुलाला जबरदस्ती घरात ठेवण्याचा आरोप आहे. लग्न भलेही प्रतिकात्मक असेल पण अल्पवयीनासोबत लग्न करणे कायद्याने गुन्हा आहे.