धक्कादायक | प्रेमवेड्या तरुणाने चक्क मावशीला पळविले आणि लग्न केले!

407
Marriage racket

एखाद्याने प्रेमात आंधळे होऊन नात्यांना काळिमा फासायचा निश्चय केला तर कोणत्याही नात्याला काळिमा फासू शकतो.

आई आणि मावशी समान नाते असते, या नात्याचा खूप आदरही केला जातो. माय मरावी पण मावशी रहावी अशी बोलीभाषेत म्हण रूढ आहे.

मात्र एका तरुणाने आपल्या मावशीसोबत पळून लग्न केल्याची अनोखी घटना समोर आली आहे. घरच्यांनी विरोध केल्यावर अखेर पोलिसांनी मध्यस्थी करुन हे प्रकरण शांतपणे सोडवले. ही घटना झारखंडमधील चतरा येथे घडली आहे.

झारखंडमधील चतरा जिल्ह्यातील रक्सी गावातील हे प्रकरण आहे. रक्सी गावातील सोनू राणा याचे आपल्या चुलत मावशीशी प्रेमसंबंध होते. दोघेही एक वर्षापासून एकमेकांच्या प्रेमात होते.

त्यांच्या लग्नाला गावातील लोकांनी विरोध केला. अल्पवयीन असल्याने त्यांचे लग्न कायद्याने चुकीचे आहे. अशावेळी दोघंही त्यांच्या एका ओळखीच्या व्यक्तीकडे रात्री थांबले. रात्र कशीतरी काढल्यानंतर दोघंही दुसऱ्या दिवशी पोलीस स्थानकात पोहोचून त्यांची मदत मागितली.

सोनू राणा आणि तरुणी दोघेही अल्पवयीन आहेत त्यामुळे दोघांच्याही कुटुंबांना पोलिसांनी स्थानकात बोलावून घेतले.

दोघांच्या घरच्यांना ठाण्याला बोलावून पोलिसांनी समजावले मात्र कोणीही नातेवाईक या लग्नाने आनंदी नव्हते. मात्र काहीही झाले तरी दोघांनीही एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता.

दोघेही अल्पवयीन असल्याने त्यांना समजावून पोलिसांनी नातेवाईकांना समजावले. दोन्ही कुटुंबाकडून बॉन्ड लिहून घेतला आणि आशिर्वाद देऊन त्यांना घरी पाठवले. पोलिसांच्या मध्यस्थीमुळे हे प्रकरण थांबले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here