पुण्यातील धक्कादायक प्रकार | सामाजिक संस्थेच्या नावाने महिलांची फसवणूक

428
Shocking type in Pune | Fraud of women in the name of social organization

पुणे जिल्ह्यातील एका व्यक्तीविरूद्ध एका मोठ्या संस्थेची ओळख दाखवून महिलांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचे नाव सम्राट पारखे आहे. 

जुन्नर तालुक्यातील ऊतूर भागात फेसबुकवर महिलांशी मैत्री करणाऱ्या सम्राट पारखे यांनी आर्थिक फसवणूक केली आणि महिला तक्रारदारांना बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

आपण जनहित मानवाधिकार या राष्ट्रीय संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे सांगत ओळखपत्र देण्याच्या नावाखाली सम्राट पारखे याने महिलांची आर्थिक लूट केली.

काही महिलांनी या भामट्याचा खरा चेहरा उघडा पाडल्यावर या भामट्याने महिलांची सोशल मीडियावर बदनामी सुरू केली. अखेर एका पीडितने या भामट्याविरोधात ओतूर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

सम्राट पारखे याने पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर परिसरातील महिलांशी फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅपवर मैत्री करून ओळख वाढवून जनहित मानव अधिकार या संस्थेचा राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे सांगितले.

या संस्थेसाठी महिलांनी काम करण्याचा आग्रह धरला. आरोपीने स्वतःची अनाथ व गरीब मुलांची संस्था असून या महिलांनी या संस्थेत प्रबोधन करावे अशी आग्रही विनंती करीत होता.

फिर्यादीवर महिलांनी आरोपीच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवला. या महिलांनीही एकमेकांकडे संपर्क साधला. सम्राट पारखे महिलांना राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे ओळखपत्र देतात. 

त्यासाठी त्याने मला सांगितले की प्रत्येकी ५००० रुपये जमा करा आणि ते मला द्या. परिसरातील महिलांनी पारखे यांना पैसे जमा करून दिले. 

मात्र संस्थेच्या नावाखाली पारखे महिलांची फसवणूक करीत असल्याचे समजल्यानंतर पीडित महिलेने या महिन्यात राजीनामा देऊन काम करण्याचे बंद केले.

दिनांक 1 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी 2.45 वाजता पीडितेच्या मोबाईल व्हॉट्सअ‍ॅपवरील एका ग्रुपवर पारखे याने त्याच्या मोबाईलवरून पीडितेच्या बाबतची लिंक पाठवून त्यात पीडिता फ्रॉड आहे. चुकीच्या मार्गाने काम करते.

ऑफिसर लोकांना महिला पुरवते तसेच वेळोवेळी या गृपवर तसेच इतर महिलांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पीडित महिला वाईट आहे, असे सांगून बदनामी केली.

वेळोवेळी अश्लील भाषेत संभाषण करून बदनामी करून तुझे कपडे काढलेले फोटो अपलोड करतो असे सांगून पीडितेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.

या सोबतच पीडितेवर जातीवाचक केस करण्याची देखील धमकी दिली. सदर प्रकार 27 एप्रिल 2020 पासून 31 डिसेंबर 2020 पर्यंत वेळोवेळी घडल्याने पीडित महिलेने सम्राट पारखे विरोधात तक्रार दिली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here