हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेलेल्या तरूणीचे स्वच्छतागृहात एका वेटरनेच मोबाईलमध्ये चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
तरूणीच्या चाणाक्षपणामुळे हा प्रकार उघडकीस आला.
तरुणीने याबाबत वेटरला विचारणा केली असता, तो धक्का देऊन पळून गेला.
ही घटना दोन दिवसांपूर्वी रात्री नऊच्या सुमारास पाषाणमधील ‘हॉटेल हॅपी द पंजाब’मध्ये घडली.
हाफिज अन्सारी (वय – 18) याच्याविरूद्ध चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी 18 वर्षीय तरूणीने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरूणी दोन दिवसांपुर्वी रात्री साडेआठच्या सुमारास कुटुंबियासोबत सुतारवाडी बंगलोर मुंबई महामार्गालगत ‘हॉटेल हॅपी द पंजाब’मध्ये जेवणासाठी गेली होती.
त्यानंतर काही वेळाने तरूणी स्वच्छतागृहात गेली होती.
तेव्हा हाफिज मोबाईलमध्ये तरूणीचे चित्रीकरण करताना दिसून आला.
त्यामुळे संबंधित तरूणीने त्याला जाब विचारला. घाबरलेल्या अवस्थेत हाफिज हॉटेलमधून बाहेर पळून गेला.
याप्रकरणी चतुःशृंगी पोलीस तपास करीत आहेत.