पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून तरुणांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. लॉकडाऊन मध्ये नोकरी गेली आणि मोबाईल गेम्सचे व्यसन जडले या दुहेरी कोंडीत एका तरुण अभियंत्याने नैराश्याने आत्महत्या केली.
ही घटना पुण्यातील कोंढवा खुर्द येथे घडली. ऋषिकेश मारुती उमाप (वय २)) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. ऋषिकेश उमाप हा त्याच्या पालकांसह कावेरी पार्क सोसायटीमध्ये राहत होता.
ऋषिकेश आपल्या कुटुंबियांसह कोंढवा येथे राहत होता
वडील शासकीय सेवेतून निवृत्त झाले आहेत. तर त्याच्या एका भावाची बंगळुरूमध्ये नोकरी आहे. सध्या ऋषिकेशआपल्या कुटुंबियांसह कोंढवा येथे राहत होता. सोमवारी रात्री तो नेहमीप्रमाणे झोपला होता. दुसर्या दिवशी सकाळी दहा वाजले तरी दरवाजा उघडला नाही, म्हणून कुटुंबीयांनी आरडाओरडा केला. दरवाजा उघडत नसल्याचे समजल्यानंतर कुटुंबातील सदस्य दार तोडून आत शिरले. ऋषिकेशने गळफास लावून आत्महत्या केल्याची दृश दिसले. या घटनेची नोंद कोंढवा पोलिसांना देण्यात आली.
तो रात्रंदिवस PUBG खेळ खेळत असे
ऋषिकेश हा पेशाने अभियंता असून लॉकडाऊनमुळे नोकरी गमावली. तेव्हापासून तो घरी आहे. तो रात्रंदिवस PUBG खेळ खेळत असे. रात्री तो त्याच्या खोलीत झोपायला गेला.
सकाळी उशिरापर्यंत तो न उठल्याने घरच्यांनी दरवाजा वाजविला, पण आतून आवाज येत नसल्याने दरवाजा तोडून आत प्रवेश केला.
तेव्हा त्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. कोंढवा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केलीय. पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.