विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसकडे असल्याने पृथ्वीराज चव्हाण विधानसभेचे अध्यक्ष होतील? संजय राऊतांचे भाकीत

121
Since Congress is the Speaker of the Assembly, will Prithviraj Chavan be the Speaker of the Assembly? Sanjay Raut's prediction

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक कोणत्याही विरोधाविना पार पडल्यास महाराष्ट्रावर उपकार होतील. 

विधानसभा अध्यक्षपद कॉंग्रेसकडे आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष कॉंग्रेसचे असतील, असे शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

सोनिया गांधी त्यांचा उमेदवार कोण ठरवतील हे ठरवतील असेही ते म्हणाले. महाविकास आघाडीत सामंजस्य आहे. विरोधकांकडून सतत सत्तेत असलेल्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

महाविकास आघाडी आकाराला येत होती तेव्हा वाटाघाटीत विधानसभा अध्यक्षपद कॉंग्रेसला देण्यात आले आहे, त्यामुळे पुढील अध्यक्ष कॉंग्रेसचेच असतील.

महाविकस आघाडीचा उमेदवार विजयी होईल. राऊत म्हणाले की, विरोधकांनी ही निवडणूक न लढल्यास महाराष्ट्रावर उपकार होतील.

मराठा समाजाबद्दल आस्था असेल तर पंतप्रधान याकडे लक्ष देतील. आता केंद्र सरकारने यातून मार्ग काढावा. देवेंद्र फडणवीस यांनी शहा यांची भेट घेतली, तिथे चर्चा करण्यासाठी काय आहे, सर्व चित्र ठळक आहे.

मराठा आरक्षणासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पंतप्रधानाची भेट घेऊन सर्व परिस्थिती समजावून सांगितली होती. त्यानंतरही वेगळी चर्चा करण्याची गरज काय? असा सवाल राऊत यांनी केला आहे.

विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार कोण असावा, हा कॉंग्रेसचा प्रश्न आहे. मुख्यमंत्री, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि सोनिया गांधी यांच्यात यावर चर्चा झाली असावी, असे राऊत म्हणाले.

कॉंग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभेचे अध्यक्ष करण्याची मागणी शिवसेनेची असेल, सेना कॉंग्रेसचे उमेदवार ठरवत नाही, अध्यक्ष निवडण्याचा पूर्ण अधिकार पक्षांतर्गत आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांचे सोनिया गांधींशी चांगले संबंध आहेत. ते एकमेकांना अडचणीच्या प्रश्नावर बोलत असतात, एकमेकांशी चर्चा करतात, परंतु काही जणांना सतत कोंडी करण्यात आनंद आहे, असा अप्रत्यक्ष टोला देखील लगावला.

हे देखील अवश्य वाचा 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here