बीडमध्ये अचानक दोन दिवसात अनेक कावळ्यांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ

262

बीडमध्ये दोन दिवसात तब्बल 22 कावळ्यांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटना बीडच्या पाटोदा तालुक्यातील भूगाव येथे घडली आहे. 

शुक्रवारी 15 कावळे आणि काल शनिवारी सात कावळ्यांचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कावळे मृत आढळल्याची ही घटना बीड जिल्ह्यातली पहिलीच आहे. 

कावळ्यांचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप अस्पष्टच आहे. घटनास्थळी वन विभागाचे पथक दाखल होऊन या मृत्यूची शहानिशा करण्याचा प्रयत्न केला मात्र अद्यापि कावळ्यांचा मृत्यू कसा झाला हे समोर आलं नाही.

काही सामाजिक कार्यकर्त्यांनी वन्यप्रेमी च्या मदतीने या कावळ्याना परिसरातील जंगलात खड्डा करून पुरण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here