देवणी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची विशेष बैठक दि.11 रोजी तालुका प्रा.अनिलजी इंगोले यांच्या अध्यक्षेतेखाली संपन्न झाली.
राज्यमंत्री ना.संजयभाऊ बनसोडे, बस्वराज पाटील नागराळकर, आ.बाबासाहेब पाटील यांच्या आदेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागाची जिल्हा व सर्व तालुका कार्यकारणीवर नियुक्ति केली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष लक्ष्मण बतले हे तालुकस्तरीय बैठका घेऊन जिल्हा व तालुका कार्यकारणी साठी ओबीसी कार्यक्रत्यांशी चर्चा करीत आहेत.
आज देवणी येथे झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग जिल्हा अध्यक्ष लक्ष्मणभाऊ बतले यांचा सत्कार करण्यात आला.
या बैठकीत जिल्हा व तालुका कार्यकारणीस प्रा.अनिलजी इंगोले, लक्ष्मण बतले यांनी मार्गदर्शन केले.या बैठकिला संदीप पाटील, अनिल कांबळे, महेश नागराळे, प्रमोद पाटील, प्रशांत घोलप, प्रवीण सूर्यवंशी, सचिन गवळी, अविनाश करवंदिकर यांच्यासह सर्व कार्यक्रते उपस्थित होते.