उदगीर : शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यासमोरील दिवे व उदगीर शहरातील सर्व रस्त्यावरील पथदिवे गत चार दिवसांपासून बंद आहेत. सोबतच अंधार असल्यामुळे महापुरुषांच्या पुतळ्यांची सुरक्षा व नागरिकांचीहि सुरक्षितता धोक्यात आली आहे.
शहरातील सर्व रस्त्यावरील पथदिवे बंद असल्यामुळे सामान्य नागरिकांना विशेषतः महिलांना नाहक त्रास होत आहे.सदर बंद असलेले पथदिवे तात्काळ सुरू करावेत अन्यथा उदगीर शहर युवक काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असे नगर परिषदेकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष तथा नगरपरिषद काँग्रेसचे गटनेते मंजूरखां पठाण, उदगीर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष अमोल कांडगिरे, उदगीर विधानसभा काँग्रेस सोशल मिडिया अध्यक्ष अमोल घुमाडे, युवक काँग्रेस जिल्हा सरचिटनिस श्रीनिवास एकुर्केकर, मा.नगरसेवक नरसिंग शिंदे, उदगीर विधानसभा युवक काँग्रेस सरचिटणीस सद्दाम बागवान, ईश्वर समगे, यशवंत पाटिल, दत्ता सगर, अविनाश गायकवाड़, धनंजय पवार, सुमित सुडे, प्रकाश गायकवाड, इत्यादि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.