राज्य सरकारकडून गणेश मंडळांसाठी पुन्हा नवीन नियमावली जाहीर

168

राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी राज्यातील निर्बंध पुन्हा कडक करण्यात आले आहे.

त्यामुळे यंदाही गणेशोत्सव साधेपणानेच साजरा करावा असा फतवा सरकारने जारी केला आहे.

राज्य सरकारने गणेश मंडळांसाठी नियमावली जाहीर केली आहे. ही नियमावली नसून फतवा असल्याची टीका भाजपाने केली आहे.

गृहविभागाकडून गणेशोत्सव साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

यामध्ये मागील वर्षीप्रमाणे यंदाही सारखेच नियम लागू केले आहेत. गणेश मंडपात गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गणेशोत्सवासाठी अशी आहे नियमावली

– गणेशोत्सवाबाबत परवानगी घेणे अपेक्षित आहे.
– गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा.
– नागरिक देतील ती वर्गणी स्विकारण्यात यावी.
– गर्दी टाळावी, गणपतीचे दर्शन ऑनलाईन पद्धतीने ठेवण्यात यावे.
– सांस्कृतिक उपक्रमाऐवजी आरोग्य कार्यक्रम राबविण्यात यावेत.
– गणपती मंडपात निर्जंतुकीकरण, थर्मल स्क्रिनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी.
– श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.

गणेश मूर्ती आणि विसर्जनासंबंधी नियम

– सार्वजनिक गणेशमूर्ती ४ फूट असावी.
– घरगुती गणेश मूर्तीची उंची २ फूट असावी.
– विसर्जन कृत्रिम तलावात करावे.
– शक्यतो शाडूच्या मातीची मूर्ती ठेवावी.
– मूर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असल्यास विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे.
– घरी शक्य नसल्यास जवळच्या कृत्रिम विसर्जनस्थळी विसर्जन करावे.
– लहान मुले व वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनास्थळी जाणे टाळावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here