महाराष्ट्रात १८ ते ४५ या वयोगटातील नागरिकांना मोफत लस देण्यास राज्य सरकार अनुकूल असल्याची माहिती अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
यावेळी मलिक म्हणाले, राज्यात लसीकरणासाठी सरकार आपल्या तिजोरीतून हा कार्यक्रम हाती घेईल. यासाठी जागतिक टेंडर मागवण्यात येणार आहे.
मागील कॅबिनेट बैठकीत या दराबाबत चर्चा झाली. यावर एकमत होत राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय झाला होता.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही होकार दिला होता. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल जाहीर केले आहे.
दरम्यान, यासाठी लवकरात लवकर टेंडर काढण्यात येणार आहे, अशी माहितीही नवाब मलिक यांनी यावेळी दिली.