मुंबई : राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रसाराबाबत आणि उपाययोजनांबाबत नुकतेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे.
यावेळी त्यांनी राज्यातील लसीच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आज महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली आहे. जोपर्यंच मुबलक प्रमाणात लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत 18 ते 45 वयोगटातील सर्वांना सर्रास लस देणे शक्य नसल्यचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
याच पार्श्वभूमीवर वयोगटानुसार स्लॉट देण्याचा विचार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. याबाबत आज दीड वाजतापासून मुख्यमंत्र्यासोबत चर्चा केली जात आहे. यात 35 ते 44 या वयोगटातील लोकांना आणि विशेषतः इतर आजारांनी ग्रासलेल्या नागरिकांना प्राधान्याने लस देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
18 ते ४४ या वयोगटातील लोकांसाठी केवळ ७ लाख ७९ हजारच लसी उपलब्ध झाल्यानं लसीकरण संथ गतीने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. अधिक लसी उपलब्ध होताच गती वाढवण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. ४५ वर्षावरील लोकांसाठी ९ लाख व्हॅक्सिन मिळाल्या आहेत.
कोरोनाचा विनाश कायम! भारतात १० दिवसांत प्रत्येक तासाला १५० रुग्णांचा मृत्यू
त्याचे वाटप झाले आणि ८ लाख लसींचा वापरही झाला. आता काही हजारच लसी ४५ वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्यांसाठी शिल्लक आहेत. यासंदर्भात केंद्राला वारंवार पत्र लिहित आहोत. केंद्रानं दबाबदारी घेतलेल्या ४५ वर्षावरील व्यक्तींसाठी तरी लस उपलब्ध करुन द्या, अशी मागणी टोपे यांनी केली.
टोपे म्हणाले, ४५ वर्षावरील व्यक्तींमध्ये की ४ ते ५ लाख लोकांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस देणे बाकी आहे. साठ दिवसाच्या आत हा डोस देणे गरजेचं आहे. केंद्र सरकारनं यासाठी लवकर मदत करावी, अन्यथा पहिल्या डोसचा प्रभावही होणार नाही
तिसऱ्या लाटेच्या अनुषंगानं म्हत्त्वाचे निर्णय
अठरा वर्षाहून लहान वयोगटातील मुलांच्या अनुषंगाने लागणारे बेड्स, व्हेंटिलेटर, तसेच वेगळ्या टाईपचे बेड तयार केले पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी रात्री दहा वाजता याबाबत चर्चा केली आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
बेड वाढवण्यासाठी, ऑक्सिजन, औषधाबाबती स्वयंपूर्ण होण्यासाठी पूर्ण तयारी सुरू केली आहे. तिसऱ्या लाटेच्या अंदाजाच्या दृष्टीकोनातून योग्य निर्णय घेण्यासंदर्भात सातत्याने तयारी सुरू आहे, असंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
सोबतच राज्याचा रिकव्हरी रेट ८५.५५ टक्क्यांवर पोहोचला असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. याशिवाय राज्याची १७०० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज केंद्रानं भागवावी, अशी मागणीही यावेळी त्यांनी केली.