राज्य सरकारचा वीज थकबाकीदारांना ‘मोठा शॉक’ | वीज कनेक्शन कापण्याची नोटीस

211

औरंगाबाद : कोरोना लॉकडाऊनच्या काळात अनेकांना भरमसाठ वीजबिले  आली आहे. काहींना अद्याप विद्युत बिले भरलेली नाही. 

भरमसाठ आलेली वीजबिले रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच कमी करण्याची मागणी होत आहे. असे असताना आता राज्य सरकारने वीज थकबाकीदारांना मोठा शॉक दिला. 

राज्यात 71 लाख 68 हजार 596 वीजग्राहकांना अशा नोटीस आल्या आहेत. नोटीसची मुदत 30 जानेवारीला संपेल. त्यानंतर सोमवारपासून वीज कनेक्शन कापण्याचा धडाका सुरू होण्याची शक्यता आहे.

15 डिसेंबरपासून नोटीसा पाठवायला सुरूवात झाली आहे. यात थकबाकी भरण्याचे आवाहन करून 15 दिवसांत थकबाकी न भरल्यास वीज कनेक्शन कापण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सर्वाधिक नोटीस पुणे विभागातील ग्राहकांना देण्यात आल्या आहेत. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी लॉकडाऊन काळातील वीजबिलात सवलत देण्यात येणार असल्याचे सांगितले होते.

ग्राहकांकडे 60 हजार कोटी रूपये थकबाकी साचल्यामुळे सरकारने आता वीज कनेक्शन कापण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. सर्वाधिक नोटीसा पुणे विभागातील ग्राहकांना बजवाण्यात आल्या आहेत.

71.68 लाख ग्राहकांना वीज कनेक्शन कापण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. सरकारची आर्थिक स्थिती नाजूक असल्याचं कारण देण्यात आले आहे.

ग्राहकांकडे 60 हजार कोटी रूपये थकीत असल्याने या नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. 15 दिवसांत थकबाकी न भरल्यास वीज कनेक्शन कापण्याचा इशारा देण्यात आला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here