राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण

196

मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. खुद्द देशमुख यांनीच सोशल मीडियावर एक ट्विट करत याबाबतची माहिती दिली. 

आपली कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचं त्यांनी या ट्विटमध्ये सांगितलं आहे. याशिवाय मागील काही दिवसांमध्ये आपल्या संपर्कात आलेल्यांनाही त्यांनी कोरोना चाचणी करण्याचं आवाहन केलं आहे.

आपली प्रकृती उत्तम असून, लवकरच कोरोनावर मात करुन आपण सेवेत हजर होवू असं म्हणत त्यांनी या संसर्गावर मात करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

 

मागील दोन दिवस देशमुख हे जयंत पाटील यांच्यासोबत परिवार संवाद यात्रेत सहभागी झाले होते. यानंतर मुंबईत काही बैठकांनाही त्यांची उपस्थिती होती.

कॅबिनेट बैठकीला गुरुवारी त्यांची उपस्थिती होती. त्यामुळे आता देशमुखांच्या संपर्कात आलेल्यांवरही कोरोनाचं सावट असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here