उदगीर : उदगीर व जळकोट तालुक्यातील शेत पाणंद रस्त्यांच्या कामाचे सुरुवात करण्यात आली. राज्य शासनाने विशेष बाब म्हणून उदगीर जळकोट तालुक्याला पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
त्याच्या अनुषंगाने शेत रस्त्याच्या शिवरस्त्याच्या कामाची राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थिती मध्ये सुरुवात करण्यात आली.
यावेळी उदगीर तालुक्यातील मैजे डिग्रज, हेर, साताळा, वायगाव, भाकसखेडा कुमठा, तोंडार, लोणी इत्यादी गावात राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी शिवरस्त्याच्या कामाचा शुभारंभ केला.
शेती हा ग्रामीण कृषी विकासाचा केंद्रबिंदू आहे, शेत हे शेतकऱ्यांचे हृदय आहेत तर रस्ते रक्तवाहिन्या आहेत. शेतीमधील कमी होणाऱ्या मनुष्यबळाचा उपलब्धतेमुळे कृषी क्षेत्रामध्ये यांत्रिकीकरण ही अत्यावश्यक बाब झाली आहे.
पेरणीपूर्वी जमिनीची मशागत करण्यापासून ते शेतमाल बाजारात पोहोचण्याकरिता यंत्रसामुग्री शेती पर्यंत जाण्यासाठी शेतीला बारमाही शेत रस्त्याची आवश्यकता आहे, अशा या शेत पाणंद रस्त्यांच्या कामासाठी शासनाकडून विशेष बाब म्हणून उदगीर साठी चार कोटी व जळकोटसाठी एक कोटी रुपये निधी मंजूर करून आणला आहे.
तसेच त्यासाठी यापूर्वी नियोजनाच्या कमतरता होत्या त्याचा अभ्यास करून सुधारित नियमावर आधारित प्रति कि.मी 100 तास जेसीबी किंवा 40 तास पोकलेन उपलब्ध करून देत आहे.
याबरोबरच प्रतिकिलोमीटर दवाई साठी वापरल्यास 5500 रुपये उपलब्ध करून देत आहे यातून उदगीर तालुक्यात किमान 470 किलो मीटर व जळकोट तालुक्यातील 130 किमी असे एकूण 600 किमी शेत पाणंद रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहेत.
प्रत्येक किलोमीटरला 85 हजार रुपये देण्यात येणार आहे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आपल्या भागातील शेती रस्त्याचे काम करून घ्यावे; असे आवाहन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले आहे.