स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधान | अजित पवार ‘नेमके’ काय म्हणाले?

435

बारामती : राज्यातील नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका काही महिन्यांवर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.

राज्यात महाविकास आघाडी म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र असले तरी स्थानिक पातळीवर हे पक्ष स्वतंत्रपणे लढण्याची शक्यता अधिक आहे.

तेव्हा राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक महत्त्वाचे विधान केले. प्रत्येकाला आपल्या पक्षाचा विस्तार करण्याचा अधिकार आहे.

अजित पवार म्हणाले की, त्या जिल्ह्यात स्थानिक नेत्याकडे व स्थानिक पदाधिकाऱ्याना स्वराज्य संस्थांबाबत अधिकार दिले आहेत.

अजित पवार काय म्हणाले?

प्रत्येकाला आपल्या पक्षाचा विस्तार करण्याचा अधिकार आहे. सध्या राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना एकत्र सरकार चालवत आहेत.

राज्य पातळीवरील नेते राज्य पातळीवर आणि इतर महत्त्वाच्या निवडणुका लढवण्याबाबत निर्णय घेतात. स्थानिक स्वराज निवडणुकीत मात्र त्या जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांना अधिकार दिले जातील.

यासंदर्भात उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, छगन भुजबळ, आम्ही सर्वजण बैठक घेऊन निवडणुकीची दिशा ठरवू, असे अजित पवार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here