माणुसकीला कलंक : 75 वर्षीय वृद्ध महिलेवर मृत्यूपूर्वी आणि मृत्यूनंतरही अत्याचार

586

पुणे जिल्ह्यात माणुसकीला मान खाली घालायला लावणारी एक निंदाजनक घटना समोर आलेली असून चक्क 75 वर्षीय वृद्ध महिलेवर मृत्यूपूर्वी आणि मृत्यूनंतरही अत्याचार करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

चाकण इथे हा प्रकार घडलेला असून पोलिसांनी मंगळवारी एका 52 वर्षीय संशयित व्यक्तीला अटक केली आहे.

सविस्तर वृत्त असे की, या दुर्दैवी पीडित वृद्ध महिलेचा अर्धनग्न मृतदेह सोमवारी पोलिसांना चाकणजवळच्या गावात तिच्या घरामध्ये आढळला होता.

पोलिसांनी सोमवारी महिलेचा मृतदेह घरात अर्धनग्न अवस्थेत सापडल्यानंतर या प्रकरणाचा वेगाने तपास सुरू केला.

घटनास्थळी मृतदेहाची अवस्था पाहता महिलेवर मृत्यूपूर्वी आणि नंतर अत्याचार झाल्याचे तपासात समोर आले.

त्यानंतर तपासामध्ये पोलिसांना एका व्यक्तीबद्दल माहिती मिळाली त्यानंतर श्वान पथकाच्या मदतीने पोलिस संबंधित संशयित आरोपीपर्यंत पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

आरोपी हा मृत वृद्ध महिलेचा शेजारीच होता. या संदर्भात तपासादरम्यान पोलिसांनी इतर शेजाऱ्यांकडून माहिती घेतली त्यावेळी, त्यांनीही संशयित व्यक्ती हा सोमवारी हत्या झालेल्या वृद्ध महिलेच्या घराजवळ आढळल्याची माहिती दिली.

त्यानंतर पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीला विचारपूस केली त्यावेळी त्याने या प्रकरणामध्ये त्याचा सहभाग असुन आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही वृद्ध महिला घरी एकटी असल्याची माहिती संशयिताला होती. त्यामुळे सोमवारी आरोपी महिलेच्या घरात शिरला.

त्यानंतर त्याने महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, पण महिलेने त्याला विरोध केला. त्यामुळे त्याने या महिलेची हत्या केली. मात्र नराधमाच्या दुष्कर्म एवढ्यावरच थांबले नाही.

महिलेची हत्या केल्यानंतरही त्याने पार्थिवावर देखिल अत्याचार केल्याचे संतापजनक कबुली त्याने दिली आहे.

हे दुष्कृत्य केल्यानंतर तो तिथून पळून गेला होता. हत्येच्या या संपूर्ण छडा लावण्यात पोलिसांना अवघ्या 24 तासांच्या आत यश आले आणि हा भयंकर उघड झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here