पलवल (हरियाणा) : हरियाणाच्या पलवल जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
या घटनेने दिर आणि वहिनी यांच्यातील नात्याला कलंकित केले आहे. दिराने आपल्या वहिनीला ब्लॅकमेल केले आणि तीन वर्ष तिच्यावर बलात्कार केला आहे.
दिराच्या त्रासाला कंटाळून अखेरीस पीडितेने धैर्याने दिराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. मात्र, आरोपी दिर अद्याप फरार आहे.
घटनेसंदर्भात ठाणे प्रभारी आनंद कुमार म्हणाले की, 27 वर्षीय पीडितेचे तिच्या पतीशी मतभेद आहे. दरम्यान, गेल्या तीन वर्षांपासून तिचा दिर अमर तिच्या घरी येत होता.
दरम्यान, 2018 मध्ये पीडित आणि तिच्या पतीमधील मतभेदांचा फायदा घेऊन अमरने तिच्यासोबत जवळीक साधली आणि तिच्यावर बलात्कार केला.
त्यानंतर अमरने पीडितेला धमकावून सांगितले की, त्याने तिचा व्हिडिओ बनविला आहे. तिने त्याला प्रतिसाद दिला नाही तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
त्यानंतर त्याने सतत 3 वर्ष ब्लॅकमेलिंग केले आणि तिच्यावर बलात्कार करण्यास सुरूवात केली.
दरम्यान, 15-20 दिवसांपूर्वी अमरने पीडित मुलीला ऑडिओ रेकॉर्डिंग पाठविले. पीडित मुलीच्या कुटुंबीयांना याची माहिती मिळाली.
त्यानंतर अमर म्हणाला की, आतापर्यंत केवळ ऑडिओ रेकॉर्डिंगच पाठविण्यात आली आहे. यानंतर व्हिडीओ रेकॉर्डिंग पाठवण्याची धमकीही दिली.
त्यानंतर घाबरलेल्या पीडितीने अमरविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली.
त्यानंतर पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीच्या आधारे आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र, आरोपी अद्याप फरार आहे.
आरोपी दिराला लवकरच बेड्या ठोकण्यात येतील असे पोलिसांनी सांगितले. मात्र, सध्या फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
- पंकजा मुंडे यांना दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा वारसा आहे, जर त्या शिवसेनेत आल्या तर त्यांचे स्वागत आहे !
- उदगीर येथील लिंगायत भवन सभागृहाच्या कामाचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते भूमिपूजन
- युपी धर्मांतर प्रकरणी तिघांना उचलले | नागपुरात दहशतवादविरोधी पथकाचे मोठी कारवाई !