उदगीरात चोरट्यांनी एटीएम मशिनसह 14 लाख 82 हजार रुपयांची रोकड पळवली

229
CRIME news

उदगीर : शहरातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँकेच्या एटीएम मशिनसह 14 लाख 82 हजार रुपयांच्या रकमेसह चोरट्यांनी एटीम मशीन पळविली आहे.

सविस्तर माहिती अशी की, रघुकुल मंगल कार्यालय बिदर रोड उदगीर समोरील सेंट्रल बँकेच्या एटीएम मशिनसह एटीममधील रोख रकमेसह (दि.१) या दिवशी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी धाडसी चोरी केली.

सदरील एटीएम मशीन चोरट्यांनी पळवल्याने उदगीरात एकच खळबळ उडाली आहे. चोरी झालेली एटीम मशीनचे काही पार्ट शेल्हाळ पाटीजवळी आमराईत आढळून आले आहेत.

या घटनेची माहिती मिळताच (दि.१मे) रोजी सकाळी 10 वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन, पोलीस निरीक्षक गोरख दिवे, पोलीस उपनिरीक्षक एडके, पोलीस नाईक, राजू घोरपडे यांनी शेल्हाळ पाटीजवळ चोरट्यांनी टाकून दिलेल्या एटीम मशीनचा पंचनामा केला.

यावेळी सेंट्रल बँकेचे कर्मचारी या घटनास्थळी दाखल झाले होते. बँक कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता 14 लाख 82 हजार रुपयांच्या रखमेसह एटीएम मशीन पळविल्याची माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here