राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आज राज्यभर घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कमालीची वाढ होत आहे.
त्यामुळे शेणाच्या गोवऱ्यांनी चूल पेटवून तीव्र आंदोलन करत निषेध करण्यात आले.
यावेळी महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी वाशिमच्या रस्त्यांवर उतरून चुलीवर भाकऱ्या भाजत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा निषेध केला.
याचवेळी, गॅस गरवाढीची मोदी यांच्या दाढीशी सुरू असलेली स्पर्धा थांबवा असा टोला त्यांना लगावला.
गॅसच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असून सध्या पंतप्रधान मोदींच्या दाढीशी दरवाढीची चाललेली स्पर्धा थांबवली जावी. केंद्र सरकार महिलांच्या प्रश्नांबाबत अजिबात संवेदनशील नाही.
ही योजना ५ कोटी महिलांपर्यंत पोहोचविण्याची योजना होती. ती पोहोचली की नाही माहीत नाही.
महिलांना मात्र या दरवाढीने मोदी सरकारने रडवले आहे. त्यांच्या या दरवाढीमुळे महिला वर्गाचे बजेट कोलमडले आहे.
नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने महिलांसाठी कुठल्याही योजना आणल्या नाही.
त्यामुळे हे सरकार महिलांच्या विरोधातील आहे. शिवाय ज्या राज्यात भाजपाची सत्ता आहे, तिथे महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात सरकारला आणि आरोपींना पाठीशी घालण्याचे धोरण सरकारने राबवले आहे, असा आरोप चाकणकर यांनी केला.
महिलांसाठी काम करणाऱ्या महाराष्ट्रातीलच नव्हे तर इतर राज्यातील स्वयंसेवी संस्थांचेही अनुदान बंद करण्यात आले आहे.
त्यामुळे महिलांच्या बाबतीत सरकार संवेदनशील नसून महिलांच्या विरोधात आहे असं स्पष्ट होतं. यापूर्वी आम्ही चूल पेटवा आंदोलन केले, त्याची दखल घेण्यात आली नाही.
याउलट आमच्या माताभगिनींच्या कराच्या पैशातून पेट्रोल पंपावर होर्डिंग्ज लावून जाहिरात करणं सुरू आहे.
त्यामुळेच या होडिंग्जच्या विरोधात यापुढील काळात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा चाकणकर यांनी दिला.