रायपूर: छत्तीसगडमधील जशपूर येथील बगीचा ठाणे हद्दीत एक धक्कादायक व विचित्र प्रेमकथा समोर आली आहे. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेतील पिडीत 35 वर्षीय महिलेने 17 वर्षांच्या मुलावर लग्नाच्या बहाण्याने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.
पीडितेने अल्पवयीन मुलावर हजारो रुपयांचा गंडा घातल्याचाही आरोपही केला आहे.
दरम्यान, पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अल्पवयीन मुलाला अटक केली असून त्याला बालसुधारगृहात पाठवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बगीचा पोलिस ठाणे परिसरातील एका महिलेने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
या तक्रारीत महिलेने सांगितले की, सुरगुजा जिल्ह्यातील 17 वर्षीय मुलगा तिच्याशी परिचित होता. दोघे फोनवर एकमेकांशी बोलत होते.
दरम्यान, ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर मुलाने लग्नाचे आमिष दाखवून महिलेशी शारीरिक संबंध ठेवले.
सदरील मुलाने वेळोवेळी महिलेकडे पैशाची मागणी केली, तेव्हा महिलेने त्याला हजारो रुपये दिल्याचाही आरोप केला आहे.
दरम्यान, महिलेने अल्पवयीन मुलाला लग्नासाठी विचारले असता त्याने विषय टाळयला सुरुवात केली.
त्यानंतर त्याने या स्त्रीला टाळण्यासाठी शक्कल लढवली आणि तिचा फोन आला की आपण त्याचे लहान भाऊ असल्याचे सांगून तिच्याशी बोलू लागला.
दरम्यान, त्याने तिला खोटे सांगितले की तो त्याचा मोठा भाऊ होता मात्र मरण पावला असल्याचे सांगितले.
जेव्हा तिला कळले की आपला प्रियकर मुलगा जिवंत आहे, तेव्हा ती स्त्री त्याच्याकडे येऊन धडकली, तिने त्याच्याशी लग्न करण्याचा आग्रहही धरला.
मात्र, मुलाने लग्नास नकार दिला. त्यानंतर संतापलेल्या महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेतली. तसेच तक्रार दाखल केली.
पीडितेच्या तक्रारीनंतर, पोलिसांनी सदरच्या अल्पवयीन मुलाला अटक केली आहे आणि त्याला बालसुधारगृहात पाठवले आहे, असे बगीचा पोलीस स्टेशनचे प्रभारी एसआर भगत यांनी सांगितले आहे. या प्रकरणाची आता पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
Also Read
- विवाहाला कुटुंबीयांचा विरोध असल्याने प्रेमभंगातून प्रेमी युगलाची गळफास लावून आत्महत्या !
- राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल; मात्र या जिल्ह्यांना दिलासा नाही : आरोग्यमंत्र्यांची माहिती
- तरुणांसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस राबवणार उद्योजक निर्माण अभियान : युवराज कांडगिरे
- मोबाईल सिमकार्डचा एक कोपरा असतो कापलेला; नेमके कारण जाणून घ्या!