सुनेने सासूचा गळा आवळून केला खून | मोठ्या लेकाने मृतदेह 2 दिवस प्लास्टिक बॅगेत लपवला !

432

पुणे / तळेगाव : सासू-सुनेचे वाद नवीन नाहीत. घरोघरी हे वाद सुरू असतात. कधी कधी हे वाद एवढे विकोपाला जातात की, त्यातून भयंकर गुन्हा घडतो.

सासू सुनेच्या किरकोळ वादातून संताप अनावर झाल्याने 22 वर्षीय सुनेने आपल्या पतीच्या मदतीने 45 वर्षीय सासूचा (Mother-in-law) ब्लाउजने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ही घटना पुणे (Pune) जिल्ह्यातील तळेगाव शहरातील टेल्को हाऊसिंग सोसायटीत घडली आहे. या घटनेप्रकरणी सून पूजा शिंदे तसेच तिचा पती मिलिंद शिंदे या दोघांना तळेगाव पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी पूजा आणि तिची मयत सासू बेबी शिंदे या दोघींमध्ये कडाक्याचे भांडण झाले त्यानंतर राग अनावर झाल्याने पूजाने घरातील कापडी ब्लाउजच्या साह्याने सासू बेबी हिचा गळा आवळला.

मृतदेह घराच्या छतावर लपवला

जेव्हा ती निपचित पडली तेव्हा संबंधित घटना आपला पती मिलिंद यास सांगितली दोघांनी संगनमत करून मृत्यूमुखी पडलेल्या बेबी शिंदे हिचा मृतदेह एका प्लास्टिकच्या पोत्यात भरला आणि कोणालाही संशय येऊ नये म्हणून मृतदेह घराच्या छतावर एका कोपऱ्यात नेऊन लपवून ठेवला होता.

परंतू दोन दिवसानंतर मृतदेह कुजू लागल्याने तसेच त्याची दुर्गंधी इतरत्र पसरू लागल्याने आपण केलेला गुन्हा उघडकीस येईल या भीतीपोटी दोघांनी मृतदेह उचलून जवळच असलेल्या एका निर्जन ठिकाणी झाडा झुडपात फेकून दिला.

तेव्हा पोत्या मधून येणाऱ्या दुर्गंधीने टेल्को कॉलनी येथील रहिवाशांचा संशय बळावला, त्यांनी तात्काळ ही घटना तळेगाव पोलिसांना कळविली. पोलिसांनी घटनास्थळावर दाखल होत शहानिशा केली असता पोत्यामध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला संबंधित मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर चौकशीसाठी मयत महिलेची सून पूजा शिंदे हिला ताब्यात घेतले.

पूजाने सुरुवातील उडवाउडवीची उत्तर दिली, पण पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरे समाधानकारक देत नव्हती, तेव्हा पोलिसांचा संशय बळावला आणि पोलिसी खाक्या दाखवताच आपण सासूच्या भांडणाला आणि त्रासाला कंटाळून तिने गळा आवळून खून केल्याची कबुली पोलिसांना दिली.

या संपूर्ण प्रकरणात पती मिलिंद याचा ही सहभाग असल्याचे पूजाने पोलिसांना सांगितले. संबंधित खुन प्रकरणी मयत महिलेचा धाकटा मुलगा अमित शिंदे याने तळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

जन्मदात्या आईच्या खुनात मोठया मुलाचा सहभाग असल्याने शहरात खुनाच्या घटनेप्रकरणी नागरीकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here