चाकुर शहरात संचारबंदी लावण्यात आल्यानंतर काहीजण विनाकारण किराणा, मेडिकल व दवाखानाच्या नावाखाली बिनधानस्तपणे शहरात फिरतांना दिसून येत आहे.
चाकूर पोलीस प्रशासनाच्यावतीने पोलीस निरीक्षक सोपान सिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली विनाकारण फिरणाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक दर्शने, चाकुर बिट अंमलदार बाळु आरदवाड, काकासाहेब जोशी व होमगार्ड यांनी नागरिकांना कोरोना नियमाचे पालन करावे आणि घरीचं रहावे यासाठी गस्त घालून आवाहन करीत होते.
घरीच राहून सुरक्षित रहा, अतिआवश्यक कामासाठीच घराच्या बाहेर पडावे. घराबाहेर निघताना माक्सचा वापर करावा, सतत सँनिटाईजरचा वापर करावा आणि सामाजिक अंतर ‘सोशल डिसटन्स’ ठेवावे असे पोलीस उपनिरीक्षक निलम घोरपडे यांनी वारंवार नागरिकांना समजावून सांगत होते. दरम्यान विनाकारण फिरणाऱ्या व विना मास्क लोकांविरुध्द दंडात्मक कार्यवाही केली आहे.