विद्यार्थिनीचे आपल्या शिक्षकावरच प्रेम जडले; तिने थेट त्याच्यासाठी घरदार सोडले

556

नवी दिल्ली : प्रेमासाठी वाट्टेल ते करायला अनेकजण कोणत्याही थराला जातात. अनेकदा मर्यादा ओलांडून माणुसकीला मान खाली घालावी लागेल असे कृत्य करतात, अशीच एक घटना राजस्थानमध्ये घडली आहे.

एका विद्यार्थिनीचे शिकता शिकता शिक्षकासोबतच प्रेम जडले आणि तिने त्याच्यासाठी घरदार सोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

बारावीत शिकणारी विद्यार्थिनी तिला इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षकाच्या प्रेमात पडली, एवढेच नाहीतर तिने त्याच्यासाठी घरदार देखील सोडले आहे.

बडू गावात ही हैराण करणारी घटना घडल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांनीही आपल्या प्रेमाची कल्पना घरच्यांना दिली होती.

मात्र घरच्यांनी त्यांच्या प्रेमाला विरोध केला. प्रेमाला विरोध झाल्यानंतर विद्यार्थिनीने शिक्षकासोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, बारावीत शिकणारी विद्यार्थिनी आणि तिचा इंग्रजीचा शिक्षक यांचे गेल्या दोन वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होते.

या काळात त्यांच्या कुटुंबीयांनादेखील याची माहिती मिळाली होती. दोघांच्याही कुटुंबीयांनी त्यांची समजूत घालत त्यांना एकमेकांपासून वेगळे होण्याचा अनेकदा सल्ला दिला होता.

मात्र या दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. ही घटना घडण्यापूर्वी एका रविवारी या शिक्षकाने गावातील झेरॉक्स सेंटरमधून आधार कार्ड आणि इतर काही कागदपत्रांच्या झेरॉक्स काढल्याचे समोर आले आहे.

त्याने एका बनावट सिम कार्डसाठीही दुकानदाराला विनंती केली होती. मात्र दुकानदाराने ते द्यायला नकार दिला होता. अशी सगळी तयारी करून त्यांनी एका जागी भेटण्याचा निर्णय घेतला आणि तिथून गाव सोडून ते पळून गेले.

कुटुंबीयांना हे दोघे कुठे गेले आहेत याबाबत काहीच माहिती नाही. तसेच घरातील काही सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनी आणि शिक्षक हे एकमेकांचे नातेवाईक आहेत.

दोघांच्याही कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस दोघांचा शोध घेत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here