नवी दिल्ली : कोरोना व्हायरस (New coronavirus strain) च्या नव्या अवताराचा धोका अद्यापही टळलेला नाही.
कामगार मंत्रालयाने अशा परिस्थितीत घरातून काम करणाऱ्यांकडून सूचना मागविल्या आहेत.
30 दिवसांच्या आत कामगार मंत्रालयाने घरातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून सूचना मागविल्या आहेत.
त्यानंतर मंत्रालय त्याचे कायद्यात रुपांतर करणार आहे.
घरापासून कामाशी संबंधित कायदा म्हणजेच नवीन औद्योगिक संबंध संहिता 1 एप्रिल 2021 पासून लागू होणार आहे.
याचा अर्थ असा की, घरातून परमनन्ट वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी नवीन कार्यसंस्कृती तयार होऊ शकेल.
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कामगार मंत्रालयाने उत्पादन, खाण आणि सेवा क्षेत्रांसाठी नवीन औद्योगिक संबंध संहिता जारी केली.
ज्यावर भागधारकांकडून अभिप्राय मागविण्यात आला आहे.
मिळालेल्या प्रतिसादाच्या आधारे हे मंत्रालय सेवा अटी आणि कर्मचार्यांच्या वर्तनाशी संबंधित मापदंड निश्चित करू शकेल.
30 दिवसांच्या आत सूचना मागविल्या
कामगार आणि रोजगार मंत्रालयाने शनिवारी एका निवेदनात म्हटले आहे.
औद्योगिक संबंध संहिता, 2020 च्या कलम 29 अन्वये केंद्र शासनाने उत्पादन, खाण आणि सेवा क्षेत्रातील मॉडेल स्थायी आदेशाचा मसुदा अधिकृत राजपत्रात प्रसिद्ध केला आहे.
याबाबत 30 दिवसांच्या आत भागधारकांकडून सूचना / हरकती मागविण्यात आल्या आहेत.
हा मसुदा ऑर्डर 31 डिसेंबर 2020 रोजी अधिसूचित करण्यात आला.
निवेदनात म्हटले आहे की, सेवा क्षेत्राची गरज लक्षात घेता या क्षेत्रासाठी प्रथमच स्वतंत्र मॉडेल स्टँडिंग ऑर्डर तयार केली गेली आहे.
आयटी क्षेत्राला ही सुविधा मिळेल
कामगार मंत्रालयाच्या वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांच्या मसुद्याच्या कामांनुसार आयटी क्षेत्राला (IT Sector) अनेक फायदे मिळू शकतात.
या आराखड्यात आयटी कर्मचार्यांना कामाचे तास माफ (Working hour) देखील होऊ शकतात.
कामगार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आराखड्यात तरतूद करण्यात आलीय.
कामगार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार सेवा क्षेत्राच्या गरजेनुसार प्रथमच स्वतंत्र मॉडेल तयार केले गेलेय.
मसुद्यातील इतर अनेक वैशिष्ट्ये
नवीन आराखड्यात सर्व कामगारांसाठी रेल्वे प्रवासाची तरतूदही करण्यात आलीय.
पूर्वी ही सुविधा फक्त खाण क्षेत्रातील कामगारांसाठी होती.
त्याचबरोबर नव्या प्रारूपात शिस्तभंग केल्याबद्दल शिक्षा देण्याची तरतूद आहे.
मसुद्यावर सरकारने सूचना मागिवल्या
कामगार मंत्रालयाने नव्या औद्योगिक संबंध संहितेबाबत सामान्य लोकांकडून सूचना मागवल्या आहेत.
आपण आपल्या सूचना पाठवू इच्छित असल्यास आपण ते 30 दिवसांच्या आत कामगार मंत्रालयात पाठवू शकता.
त्याचबरोबर कामगार मंत्रालय एप्रिलमध्ये हा कायदा लागू करू शकेल, अशी अपेक्षा आहे.