तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या महिला डाॅक्टरची आत्महत्या !

727
डॉ. प्रांजल ज्ञानेश्वर कोल्हे

जालना : भोकरदन शहरातील शिवाजीनगर भागातील रहिवाशी डॉ. प्रांजल ज्ञानेश्वर कोल्हे (वय २४) यांनी रविवारी (दि.३०) दुपारी दीड वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरी साडीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार डॉ. प्रांजल या शहरातील जनाई हॉस्पिटलचे संचालक डॉ. ज्ञानेश्वर कोल्हे यांच्या पत्नी होत्या. तीन महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. (Suicide of female doctor who got married three months ago)

डॉक्टर असलेल्या नवविवाहितेने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शहरातील ग्रामीण रुग्णालयात दुपारी उत्तरीय तपासणी केल्यानंतर सायंकाळी सात वाजता तालुक्यातील बरंजळा साबळे या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

डॉ. प्रांजल यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी इंदलसिंग बहुरे, पोलिस निरीक्षक शालिनी नाईक, पोलिस उपनिरीक्षक अर्जुन पवार आदींनी भेट देऊन पाहणी केली.

या प्रकरणी भोकरदन पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अर्जुन पवार हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here