सांगलीत डॉक्टराची गळफास घेऊन आत्महत्या, पती- पत्नीतील वादातून टोकाचे पाऊल उचलल्याची तक्रार !

312
Suicide by hanging of a highly educated youth on 'Proposal Day'

सांगली : सांगलीतील (Sangli Crime) एका डॉक्टराने गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

बुधवारी रात्री फ्लॅटमध्ये असलेल्या दोन बेडरुमपैकी एका बेडरुममध्ये त्यांनी छताच्या फॅनला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे.

डॉ. दीपक रामकृष्ण राऊत (वय, 55, रा. निर्मिती रेसिडेन्सी, चिंतामणीनगर, सांगली) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टराचे नाव आहे.

याप्रकरणी सांगलीतील संजयनगर पोलीस ठाण्यात (Sanjaynagar Police Station) आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येच कारण अद्याप अस्पष्ट आहे.

याबाबत माहीती अशी की, सांगलीतील चिंतामणीनगर येथील निर्मिती रेसिडेन्सीमध्ये (फ्लॅट नंबर 402) मध्ये डॉ. दीपक राऊत (Dr. Deepak Raut) हे वास्तव्यास होते.

डॉ. राऊत हे विश्रामबाग येथील आदित्य रुग्णालयात कार्यरत होते. राहत्या घरी त्यांनी बेडरुममध्ये त्यांनी छताच्या फॅनला ओढणीने गळफास घेतला आहे.

हा प्रकार पहाटे 6 च्या दरम्यान समोर आला आहे. याबाबत माहीती मिळताच संजयनगर पोलीसांनी (Sanjaynagar Police Station) घटनास्थळी धाव घेतली.

पंचनामा करुन मृतदेह सरकारी रुग्णालयात तपासणी केला. त्यानंतर मृतदेह कुंटूबीयांच्या ताब्यात दिले गेले.

दरम्यान, या डाॅक्टराने लिहीलेली एक चिठ्ठी सापडली आहे. त्या चिठ्ठीमध्ये लिहीले आहे की, ताई, दादा, पिंकू मला माफ करा, मी स्वखुशीने जीवन संपवत आहे. याबाबत कोणालाही जबाबदार धरू नये, असे डॉ. राऊत यांनी म्हटले आहे.

मात्र, पती- पत्नीत वारंवार वाद होत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत फिर्याद डॉ. राऊत यांच्या नातेवाईक वर्षा सचिन माने यांनी दिली आहे. तर, डॉ. राऊत यांच्या पत्नी या महापालिकेत नोकरीस आहेत.

या दरम्यान, मंगळवारी रात्री डॉ. राऊत हे ‘मी आत्महत्या करणार’, असे म्हणत होते.

त्यासाठी त्यांनी दोरीही घेतली होती. ही माहिती त्यांच्या पत्नीने पोलिसांना दिली.

जवळचं पोलिस ठाणे असल्याने पोलिसांनी तत्काळ धाव घेतली. डॉ. राऊत यांच्याकडील दोरी काढून घेतली.

त्यांची समजूत काढून शांत केले होते.
तरीही त्यांनी रात्री आत्महत्या केल्याचे समोर आले. असं पोलीसांनी (Police) सांगितलं आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here