चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील केळझर जंगलात एका जोडप्याचे कुजलेले मृतदेह सापडले. पोलिसांनी तपास केला तेव्हा प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याचे समोर आले.
चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यातील केळझर जवळ जंगलात दोन प्रेमी युगुलांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
वन परिक्षेत्र चिचपल्ली अंतर्गत अजयपूर केळजार मार्गावरील पिंपळझोरा मारोती मारुती देवस्थानजवळ कक्ष क्रमांक 428 मध्ये गस्त घालत हे जोडपे आढळून आले.
वनरक्षक महादेव मोरे आपल्या सहकाऱ्यांसह रस्त्यापासून अर्धा किमी आत जंगलात गस्त घालत होते.
तेव्हा एक पुरुष आणि महिलेचे मृतदेह आतल्या जंगलात कुजलेले आढळले. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले.
घटनास्थळी कुजलेल्या अवस्थेत एका पुरुष आणि एका महिलेचे मृतदेह जमिनीवर पडलेले आढळले.
घटना उघडकीस येण्याच्या दहा दिवस आधी पोलिसांनी घटनास्थळापासून काही अंतरावर रस्त्याच्या कडेला असलेली दुचाकी जप्त केली होती.
पोलिस तपासात उघड झाले की, दुचाकी त्याच्या मूळ मालकाने चंद्रपूरमध्ये विकली होती.
तपास सुरू असताना ही दुचाकी जिथे सापडली त्या ठिकाणापासून अर्धा कि.मी. अंतरावर दोघांचे मृतदेह सापडले.
मृतक राजु होमदेव आत्राम रा. रामणगट्टा पो.स्टे.आष्टी असल्याची खात्री पटली.
याच गावातील सलोनी रामकृष्ण मडावी (१८) आणि राजू यांचे प्रेमसंबंध होते. मात्र कुटुंबीयांच्या विरोधामूळे राजु आणि सलोनी यांचा विवाह होऊ शकला नाही.
आपल्या लग्नास विरोध होत असेल तर जीवन जगण्यात काहीच अर्थ नाही असे ठरवुन दोघांनीही जीवन संपविले.
हे देखील वाचा :
- Unknown Calls मुळे फोन फ्लाइट मोडवर न ठेवता सोपी ट्रिक वापरून पहा !
- “देशाच्या इतिहासामध्ये एवढा वेगवान मुख्यमंत्री यापूर्वी कधी झाला नव्हता,” भाजपाची उद्धव ठाकरेंवर टीका
- मराठवाड्यात सर्वत्र संततधार | लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, नांदेड येथे सूर्यदर्शन नाही; पिकांवर रोगराई पडू लागली !