मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री अंकिता लोखंडे लग्न करतेय की काय अशी चर्चा रंगू लागली आहे.
कारण तिच्या मेंदी सेरेमनीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बॉयफ्रेंड विकी जैनसह ती लग्न करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
अंकिता सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. आपल्या प्रोफेशनल लाइफसह पर्सनल लाइफही ती आपल्या चाहत्यांसह शेअर करते.
अंकिता आणि तिची बहीण अशितानं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामुळे अंकिताच्या लग्नाची चर्चा होऊ लागली आहे. कारण यामध्ये अंकितानं मेंदी लावलेली आहे.
अंकितानं आपला हा फोटो QandA सेशन सेशनदरम्यान शेअर केला होता. अंकिताची बहीण अशितानंदेखील आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर अंकिताचा मेंहदी लावताना व्हिडीओ शेअऱ केला आहे.
आता अंकिताचा मेहंदी लावलेला फोटो व्हायरल झाल्यानंतर तिच्या लग्नाची चर्चा अधिक रंगू लागली आहे. अंकितानं गुपचूप मेहंदी सेरेमनी केली, अशी शक्यता बहुतेकांनी व्यक्त केली आहे. ती बॉयफ्रेंड विक्की जैनसह लग्न करतेय की काय असा अंदाज सर्वांनी बांधला आहे.
यामध्ये अशिता तिला प्रेमानं मिठीही मारते. अंकिताही खूपच आनंदी दिसते आहे. सुशांतसह नातं तुटल्यानंतर अंकिता बिझनेसमन विकी जैनसह रिलेशनशिपमध्ये आली.
अंकिता आणि विकी कधीतरी एकत्र दिसतात आणि आपले एकमेकांसोबतचे फोटोही ते सोशल मीडियावर शअर करतात. त्या दोघांची एंगेजमेन्टही झाली आहे. त्यांच्या लग्नाच्या बातम्या समोर येत होत्या.
2009 साली पवित्रा रिश्ता या मालिकेत सुशांत आणि अर्चना एकत्र आले. मालिकेतील मानव-अर्चना या जोडीने लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. पण प्रत्यक्ष आयुष्यातही ही जोडी लोकांच्या पसंतीस उतरली.
यानंतर अंकिता आणि सुशांत दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. जवळपास सहा वर्षे ते एकत्र होते. मात्र नंतरच्या काळात काही मतभेद झाले आणि सुशात-अंकिता यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि चाहत्यांनाही ते आवडलं नाही.