पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशय | पतीने पत्नीचे गुप्तांगचं शिवले !

248
CRIME news

उत्तरप्रदेशमधील रामपूर शहरात एका पतीने त्याच्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून तिचे गुप्तांग तारेने शिवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्या महिलेची प्रकृती गंभीर झाली आहे. रामपूरमध्ये राहणाऱ्या किशोर (नाव बदलले आहे) याचे दोन वर्षांपूर्वी एका 20 वर्षीय तरुणीसोबत लग्न झाले होते.

लग्नापासूनच किशोर कायम तिच्यावर संशय घ्यायचा. तिला घराबाहेर पडू द्यायचा नाही, कुणाशी बोलू द्यायचा नाही, सतत तिचा मोबाईल चेक करायचा.

त्याला असे वाटत राहायचे की आपली पत्नी दुसऱ्या कुणासोबत तरी शारीरिक संबंध ठेवते. त्याच्या पत्नीने अनेकदा त्याला समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो तिच्यावर विश्वास ठेवत नव्हता.

शुक्रवारी त्या दोघांचे कोणत्यातरी कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. त्याने तिला बेदम मारले, तिचे हात पाय बेडला बांधले. त्यानंतर घरातील विजेच्या तारा तोडून त्यातील तांब्याची तार काढली व त्याने पत्नीचे गुप्तांग शिवले.

त्यानंतर त्याने तिचे हात पाय सोडले व तिला याबाबत कुणालाही सांगितलं तरी जीवे मारण्याची धमकी देऊन तेथू निघून गेला. गुप्तांग तारेने शिवल्यामुळे महिलेला भयंकर रक्तस्त्राव होत होता.

तिने त्या अवस्थेत मोबाईलवरून आईला फोन करून तत्काळ बोलावून घेतले. त्यानंतर तिच्या माहेरच्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले.

त्यावेळी तिच्यासोबत घडलेला प्रकार ऐकून त्यांनाही धक्का बसला व त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्या नराधम पतीला अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here