जळगाव : जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधीमध्ये प्रेमविवाह करून घरी परतलेल्या तरुणीचा दुसऱ्याच दिवशी सासरी मृत्यू झाला.
या तरूणीच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच आता तिच्या पतीचा देखील मृत्यू झालाय.
प्रशांत पाटील असं या तरूणाचं नाव आहे. प्रशांत यांचा रूग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झालाय.
आरती भोसले आणि प्रशांत पाटील यांचं एकमेकांवर प्रेम होतं तर दोघेही काही दिवस बेपत्ता होते.
त्यानंतर ते थेट लग्न करून घरी परतले होते. दोघांच्याही कुटुंबाने पोलिसांसमोर त्यांच्या विवाहाला मान्यता देत वाद मिटवला होता.
दरम्यान लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी आरतीचा संशयास्पद मृत्यू झाला. विषबाधा झाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला.
प्रशांत पाटील यानेही विषारी औषध घेतल्याने त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्याच्याही उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे.