स्वरा भास्करच्या मुख्य भूमिकेतील ‘भाग बिनी भाग’ ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे. या मालिकेत भारतीय वंशाचा अमेरिकन अभिनेता रवी पटेल स्वरासोबत मुख्य भूमिकेत आहे.
रवी पटेल यापूर्वी चार्लीझ थेरॉनसोबत ‘द लॉन्ग शॉट’ मध्ये दिसला होता आणि लवकरच तो ‘वंडर वूमन’ या चित्रपटात दिसणार आहे. रवी पटेलने भारतीय वेब मालिकेत काम करण्याबद्दलचे आपले अनुभव सांगितले आहेत.
गुजरातमधील खेड्यात जन्मलेल्या रवी पटेलचे वेब सिरीजमध्ये स्वरा भास्करसोबत चुंबनदृश्य आहे. या किसिंग सीनबद्दल विचारले असता रवी म्हणाला की, स्वरालाच याबद्दल खास विचारले पाहिजे.
तो विनोदपणे म्हणाला की, स्वरा नशीबवान आहे कारण मी तिला चुंबन घेण्यासाठी मिळालो.
रवीला बॉलिवूडबद्दल काहीच माहिती नाही
रवी हॉलिवूडचे एक मोठे नाव आहे आणि तो भारताशी संबंधित आहे. परंतु भारतीय चित्रपट उद्योग आणि बॉलिवूडबद्दल काही माहिती नाही असे त्याचे म्हणणे आहे.
तो म्हणाला की, त्याला फक्त निर्माता रॉनी स्क्रूवाला माहित आहे आणि ‘मीट द पटेल’ या शोमध्ये त्यांच्या मुलीबरोबर काम केले आहे.
आगामी ‘वंडर वूमन’ या चित्रपटाविषयी बोलताना रवी म्हणाला की, या चित्रपटातील आपल्या व्यक्तिरेखेबद्दल तो काही सांगू शकणार नाही. परंतु तो यात एका भारतीय माणसाची व्यक्तिरेखा साकारत नाही हे नक्की आहे.