T20 World Cup 2021 चं वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी IND Vs PAK आमनेसामने

535

टी20 विश्वचषकादरम्यान, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये 24 ऑक्टोबर रोजी दुबई येथे सामना खेळवला जाणार आहे.

त्यामुळं हा ब्लॉकबस्टर सामना पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींनी आतापासूनच बेत आखण्यास सुरुवात केली आहे.

युएई अर्थात संयुक्त अरब अमिराती येथे ही स्पर्धा पार पडणार असून ओमान, अबुधाबी, दुबई आणि शारजाह येथे सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे.

टी20 विश्वषकासाठीचे गट

राऊंड 1 –

ग्रुप ए- श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड, नामीबिया

ग्रुप बी- बांगलादेश, स्कॉटलँड, पापुआ न्यू गुएना (पीएनजी), ओमान

सुपर 12

ग्रुप 1- इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रीका, वेस्टइंडीज, ए1 आणि बी2

ग्रुप 2- भारत, पाकिस्तान, न्यूजीलंड, अफगानिस्तान, ए2 आणि बी1

17 ऑक्टोबरपूर्वी पहिल्या फेरीतील सामने

या स्पर्धेची सुरुवात 17 ऑक्टोबरपासून ओमान आण पीएनजी या देशांतील सामन्यानं म्हणजेच राऊंड 1 ग्रुप बी सामन्यानं होणार आहे.

यामध्ये स्कॉटलंड, बांगलादेशही एकमेकांच्या समोर उभे ठाकणार आहेत. राऊंड 1 चे सामने 17 ते 22 ऑक्टोबरपर्यंत खेळवण्यात येतील.

प्रत्येक ग्रुपमधून अग्रस्थानी असणारे दोन संघ 23  ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या सुपर 12 फेरीमध्ये जातील.

सुपर 12ची सुरुवात 23 ऑक्टोबरपासून

सुपर 12 सत्राची सुरुवात 23 ऑक्टोबरपासून अबूधाबी येथे होणार आहे. मध्ये ग्रुप ए मधून ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या संघांमध्ये सामना होईल.

यानंतर (England) इंग्लंड आणि वेस्ट इंडिज, 30 ऑक्टोबरला इंग्लंज विरुद्ध ऑस्ट्रेलिया असे सामने होतील. ग्रुप 1 टे सामने 6 नोव्हेंबरपर्यंत संपतील.

भारताचा समावेश ग्रुप 2 मध्ये

भारताचा (india) समावेश ग्रुप 2 मध्ये करण्यात आला असून, या गटाचे सामने 24 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत.

भारत विरुद्ध पाकिस्तान याच सामन्यानं याची सुरुवात होईल. अफगाणिस्ताचा संघ शारजाहमध्ये टी20 विश्वचषकाची सुरुवात करेल.

उपांत्य आणि अंतिम सामना

10 नोव्हेंबर रोजी टी20 विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना म्हणजेच सेमी फायनल अबू धाबी येथे खेळवण्यात येईल, तर 11 नोव्हेंबरला दुसरी सेमीफायनल होईल.

या विश्वचषकाचा अंतिम सामना 14 नोव्हेंबरला दुबई येथे खेळण्यात येईल. तेव्हा आता या क्रिकेट विश्वचषकात कोणता संघ बाजी मारतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here