Tauktae Cyclone Latest Update | तौत्के चक्रीवादळाचा संपूर्ण महाराष्ट्रावर परिणाम, कोकणासह मुंबईला जबर तडाखा

299
Cyclone Tauktae

अरबी समुद्रात ‘तौत्के’चक्रीवादळ घोंगावत असून याचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रात जाणवत आहे. सकाळपासूनच मुंबईत जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. (Tauktae Cyclone Latest Update)

दर तासाला अधिक सक्रिय होणारे चक्रीवादळ सध्या गुजरातच्या दिशेने वाटचाल करत आहे. कोकण किनारपट्टीच्या समांतर वेगाने येणारे चक्रीवादळ ‘तौत्के’ने जोर पकडल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या किनाऱ्या जवळील रजनागिरी तालुक्यातील राजापूरमधील जवळजवळ सर्व खेड्यांना त्याचा तडाखा बसला आहे. 

यामुळे किनाऱ्यावर बरेच नुकसान झाले आहे. रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या किनारपट्टी भागातून आतापर्यंत 6,540 लोकांना हलविण्यात आले आहे.

तौत्के चक्रीवादळाचा मुंबईला फटका

तौत्के चक्रीवादळाचा जोरदार तडाखा कोकण किनारपट्टीसह मुंबईला बसला आहे. अनेक भागात सकाळपासून वीज गायब झाली आहे. दरम्यान मुंबईपासून भर समुद्रात 175 किमी दूर मुंबई हाय फील्डवर 273 जण अडकले आहेत. त्यांची सुखरुप सुटका करण्यासाठी वेगवान वारे आणि अजस्त्र लाटांच्या मध्ये नौदलाने बचाव कार्य सुरु केले आहे.

Cyclone Tauktae Updates: About 150 km from Mumbai; Here's how the hurricane's journey began | Cyclone Tauktae Updates

सकाळी दहा वाजेपर्यंत मुंबई शहरासह उपनगरातील बहुतांश ठिकाणांना मुसळधार पावसाने आणि वादळी वाऱ्याने झोडपून काढले होते. सकाळी दहानंतर देखील पावसाचा आणि वादळी वा-याचा वेग कायम होता. परिणामी भल्या पहाटे घड्याळ्याच्या काट्यावर धावणारी मुंबापुरी सोमवारी मात्र अत्यंत धीम्या गतीने धावत होती.

त्यात उपनगरी रेल्वेच्या सेवेत अडथळे आल्याने समस्यांमध्ये आणखीनच वाढ झाली आहे. दुसरीकडे सुरक्षेच्या कारणास्तव मोनो रेलची सेवा देखील खंडित करण्यात आली होती. याव्यतिरिक्त नेहमी भरभरुन वाहणाऱ्या मुंबईच्या रस्त्यांवर आज केवळ पाऊस आणि वारेच धावत असल्याचे चित्र होते.

 मुंबईनजीक येऊन पोहचले

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं रुपांतर तौक्ते चक्रीवादळात झालं असून अतिशय रौद्र रुप धारण करत हे वादळ आता मुंबईनजीक येऊन पोहचले आहे.

रविवारपर्यंत गोवा, रत्नागिरी आणि उर्वरित कोकण किनारपट्टीवर धुमाकूळ घातलेलं हे वादळ आता काहीसं पुढे सरकलं असून, सध्याच्या घडीला त्याचं केंद्र हे मुंबईच्या समुद्रसपाटीपासून 150 किमी समुद्री भागात असल्याचं सांगण्यात येत आहे.

हनीट्रॅपचा पर्दाफाश : तिने त्याला ‘प्रेम जाळ्यात’ अडकवले पण पोलिसांनी त्याला वाचविले !

सध्याच्या घडीला मुंबई, नवी मुंबई आणि पश्चिम उपनगरां मध्ये मोठ्या प्रमाणावर सोसाट्याचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे, तर काही भागांत मुसळधार ते मध्यम स्वरुपाच्या पावसालाही सुरुवात झाली आहे.

पुढील ४-५ तास मुंबईत अशीच परिस्थिती कायम राहणार असून, दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास तौक्ते चक्रीवादळ मुंबईपासून पुढे उत्तरेकडे सरकणार आहे. पुढे गुजरात दिशेनं या वादळाचे परिणाम दिसण्यास सुरुवात होणार आहे.

किनारपट्टी भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार

हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार, चक्रीवादळाचा प्रभाव मुंबई आणि किनारपट्टी भागावर राहणार, मुसळधार आणि अतिमुसळधार पाऊस काही ठिकाणी कोसळणार, पुढच्या 24 तासात उत्तर कोकणात पाऊस, दक्षिण कोककणात ढगाळ वातावरण असेल, मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्या काही ठिकाणी पाऊस कोसळेल असा अंदाज व्यक्त केला आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here