उदगीर : कोरोनाची दुसरी लाट उग्र होऊ लागल्याने सुरुवात होताच उदगीर शहरातील कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन तहसीलदारांनी विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी खाजगी शाळेतील शिक्षकांची नेमणूक केली होती.
त्यांना नेमुन दिलेल्या ठिकाणी त्यांनी तत्परतेने सेवा बजावली 23 एप्रिल रोजी आपली सेवा बजावून रात्री 8 वाजेच्या दरम्यान त्यांच्या घरी गेले असता त्यांचा हृदविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.
त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती कळताच त्यांच्या सोबत 26 मार्च पासून काम काम करणारे शिक्षक व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी हळहळ व्यक्त करीत आहेत.
शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांनी शिक्षकांस भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली एका मनमिळाऊ धाडसी कर्तबगार शिक्षकांचा मृत्यू झाल्याने आणखी सेवा बजावणाऱ्या शिक्षकांनी चिंता व्यक्त केली आहे.
26 मार्च रोजी एकूण 8 शिक्षक कामावर रुजू झाले होते. या शिक्षकांनी चार दिवसांपूर्वी गटशिक्षणाधिकारी उदगीर यांच्याकडे अर्जही केला होता. आम्ही सर्व शिक्षक 20 दिवसापासून दंडात्मक कारवाईची सेवा बजावत आहोत, आता आमची नेमणूक रद्द करून दुसऱ्या शिक्षकांची नेमणूक करण्यात यावी अशी विनंती शिक्षण विभागाकडे केली होती.
मात्र शिक्षकांनी दिलेल्या अर्जावर शिक्षण विभागाने निर्णय घेण्यात दिरंगाई केली. जर वेळेत विनंतीचा विचार केला असता तर शिक्षकांचा मृत्यू झाला नसता अशी जोरदार चर्चा शिक्षक वर्गातून करण्यात येत आहे.