Tech News | उद्यापासून WhatsApp होणार बंद ! कारण काय?

287

मुंबई: नव्या वर्षाच्या सुरुवातीला जुने स्मार्टफोन्स वापरणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. उद्यापासून काही जुन्या स्मार्ट फोन्समध्ये WhatsApp ची सुविधा बंद होणार आहे.

तसेच Apple च्या iOS 9 आणि Android 4.0.3 ऑपरेटिंग सिस्टिम असलेल्या फोनमध्येही WhatsApp सपोर्ट करणार नाही.

आपल्याकडे जर Samsung Galaxy S2 किंवा iPhone 4 हे मोबाईल फोन असतील तर या फोनमधील WhatsApp वापरण्यास अडचण येऊ शकते किंवा ही सुविधा उद्यापासून बंद होऊ शकते.

एका अहवालात असं सागंण्यात आलंय की Android 4.0.3 आणि त्याच्या आधीच्या व्हर्जनच्या स्मार्टफोनचा WhatsApp चा सपोर्ट काढून घेण्यात आला आहे.

जर आपल्याकडे या व्हर्जनचा स्मार्टफोन असेल आणि आपल्याला त्यात WhatsApp वापरायचं असेल तर तो स्मार्टफोन अपग्रेड करावा लागेल.

त्याचसोबत आपण जर apple चा iOS 9 वापरत असाल किंवा त्यापेक्षा कमी व्हर्जनचा आयफोन वापरत असाल तर त्यालाही अपडेट करावं लागेल. जर आपला आयफोन अपडेट होत नसेल तर WhatsApp वापरता येणार नाही.

Google Nexus S, HTC Deisre S आणि Sony Ericsson Xperia Arc हे स्मार्टफोन्स एकेकाळी लोकप्रिय होते. त्यामध्ये अपडेटची सुविधा उपलब्ध नाही.

त्यामुळे या फोन्समधील WhatsApp उद्यापासून बंद होण्याची शक्यता आहे. नव्या वर्षात WhatsApp अनेक नवे फिचर्स उपलब्ध करुन देणार आहे, तसेच मल्टी डिव्हाइसची सोय उपलब्ध करुन देणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here