मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासमवेत सत्ता स्थापण्याच्या निर्णयावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
अजित पवार यांच्याबरोबर सरकार स्थापन करण्याचा पश्चाताप नाही. परंतु आम्हाला असे सरकार स्थापन करायचे नव्हते, ती आमची चूक होती. शंभर टक्के म्हणतो, ती चूक होती. परंतु त्याची खंत नाही, अशी कबुली देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकसत्ता’ ला खास मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अजित पवार यांच्यासमवेत सकाळी सरकार स्थापन करण्याच्या भूमिकेवर प्रकाश टाकला.
‘ त्या घटनेचे त्यासाठी दु: ख नाही, पण ती एक चूक होती. शंभर टक्के ही चूक होती, परंतु यात काही खेद नाही. कारण जेव्हा तुमच्या पाठीवर खंजीर खुपसला जातो, तेव्हा असे न आवडणारे निर्णय घ्यावे लागतात.
कारण तेव्हा तुम्हाला राजकारणात जिवंत राहावे लागते. तुम्हाला जर जीवंत राहण्यासाठी सर्वकाही करावे लागेल. कारण जर तुम्ही राजकारणात मराल तर तुमचे अस्तित्व संपून जाईल.
आपल्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्याना धडा शिकवण्यासाठी काही वेळा असे करावे लागते. त्यावेळी संमिश्र भावनेतून उत्तर दिले गेले. राग, संताप, प्रतिशोध या साऱ्या भावना त्यात होत्या. जेव्हा संधी निर्माण झाली तेव्हा आम्ही त्याचा फायदा घेतला, असे फडणवीस म्हणाले.
माझी प्रतिमा खराब झाली
“अजितदादांसोबत जाण्याचा निर्णय व आमच्या भूमिकेचा निर्णय आमच्या समर्थकांना आवडला नाही. बाकीचा सोडून द्या, पण भाजप समर्थकांना तो अजिबात पसंत नव्हता. खरे तर मी कबूल करतो की आमच्या समर्थकांच्या मनात असलेली प्रतिमा बिघडली. “मला वाटते मी ते केले नसते तर बरे झाले असते. पण त्यावेळी मला वाटले की ते अधिक योग्य आहे, असे फडणवीस म्हणाले.
सरकार स्थापनेचा अजेंडा नाही
राज्यात नेहमीच भाजप-राष्ट्रवादी किंवा भाजप-शिवसेना एकत्र येण्याची चर्चा असते. राज्यात असे काही चालू आहे का? असा सवाल फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. राज्यात जर अशी चर्चा सुरू असेल तर मजेदार आहे.
काही लोक म्हणतात कि, आम्ही कधी शिवसेनेबरोबर तर कधी राष्ट्रवादीबरोबर जाऊ. काहीजण असे म्हणतात की कधी कधी शिवसेनेचे लोक आमच्याकडे येतील तर कधी राष्ट्रवादीचे लोक आमच्याकडे येतील, अशी चर्चा होणे चांगले असते. चर्चेत राहिले पाहिजे. परंतु याक्षणी आपण कोणाशीही चर्चा करत नाही. असा कोणताही अजेंडा नाही. सरकार स्थापन करण्यासारखे काही नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
कॉंग्रेस सेनेबरोबर जाणार नाही असे वाटले
शिवसेनेने राष्ट्रवादीशी बोलण्यास सुरवात केली तेव्हा तीन पक्षांच्या चर्चा सुरू झाल्या. आम्हाला सांगण्यात आले की हे लोक एकत्र येऊ शकतात. त्यावेळी राष्ट्रवादी आणि सेना एकत्र येणार असा विचार होता.
तेव्हा वाटले कि काहीही झाले तरी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येणार नाहीत असे वाटत होते. कॉंग्रेसचा इतिहास बघितला तर असे वाटले,पण आम्ही चूक केली.
राजकारणात गोष्टी बदलत असतात. राष्ट्रवादीबरोबर जाणे आमच्यासाठी अनैतिक होते. हे सरकारही अनैतिक आहे. पण परिस्थितीमुळे सर्व गोष्टी घडत आहेत, असे ते म्हणाले.
तुमच्यासाठी निवडक बातम्या
- Crime News : डॉक्टरने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा नर्सचा आरोप
- Maharashtra Unlock : सरकारची पाच स्तरात योजना, अनलॉकची नियमावली व तुमचा जिल्हा यादीत आहे का?तपासून पहा !
- जुही चावलाला ‘5G’ प्रकरणात हायकोर्टाचा दणका, याचिका फेटाळून 20 लाखांचा दंड ठोठावला !