The Family Man 2 Trailer : मनोज वाजपेयी अभिनीत मोस्ट अवेटेड वेब सीरीज ‘द फॅमिली मॅन 2’चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
ट्रेलरबाबत बोलायचे झाले तर पुन्हा एकदा मनोज वाजपेयी यांनी चाहत्यांची मने जिंकली आहेत. धमाकेदार अभिनयाने ट्रेलरमध्ये मनोज वाजपेयींवरुन नजर हटवणे अवघड झाले आहे. ट्रेलर रिलीज करण्यासोबतच निर्मात्यांनी सीरीज 4 जून 2021 रोजी रिलीज करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.
‘द फॅमिली मॅन 2’ लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राईमवर रिलीज करण्यात येणार आहे. सीरीजच्या पहिला सीझन पाहिल्यानंतर चाहते दुसऱ्या सीझनच्या प्रतिक्षेत होते. आजा या सीझनचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. ट्रेलर पाहून चाहते आता सीरिज पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
या सीझनमध्येही मनोज वाजपेयी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना खिळवून ठेवणार आहेत. या सीझनमध्ये श्रीकांत तिवारी नवीन, शक्तिशाली व क्रूर प्रतिस्पर्धी राजीचा सामना करणार आहे. सामंथा अक्किनेनीने राजीची भूमिका साकारली आहे.
या थ्रिलर सिरीजच्या 9 भागांच्या नवीन सीझनमध्ये श्रीकांत मध्यमवर्गीय फॅमिली मॅन आणि गुप्तचर अशी दुहेरी भूमिका साकारताना दिसणार आहे. निर्मात्यांनी ‘द फॅमिली मॅन 2’ फेब्रुवारीमध्ये रिलीज न केल्याबाबत निर्मात्यांनी निराशा व्यक्त केली होती. तसेच यंदाच्या समर सीझनमध्ये सीझन रिलीज करण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं.