खुषखबर : देशातील करोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी ८५ लाख ७४ हजार ३५० वर पोहचली

305
coroana stay home

नवी दिल्ली: देशात कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत आहे. सलग 11 व्या दिवशी, देशातील संसर्ग दर 10 टक्क्यांपेक्षा खाली आला आहे. देशातील संसर्गाचे प्रमाण 6.37 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.

शुक्रवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात गुरुवारी ( दि.३ जून) १ लाख ३२ हजार ३६४ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या २४ तासांत करोनामुळे २७१३ जणांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात २ लाख ०७ हजार ०७१ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

धक्कादायक ! प्रेयसीचा खून करून दुसरे लग्न करणाऱ्या आरोपीने दुसऱ्या पत्नीला दागिने देण्यासाठी सराफाची हत्या केली !

याचसोबत, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी ८५ लाख ७४ हजार ३५० वर पोहचलीय. देशात आत्तापर्यंत २ कोटी ६५ लाख ९७ हजार ६५५ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत. तर सध्या १६ लाख ३५ हजार ९९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर देशातील मृतांची एकूण संख्या ३ लाख ४० हजार ७०२ वर पोहचलीय.

 • एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : २ कोटी ८५ लाख ७४ हजार ३५०
 • एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : २ कोटी ६५ लाख ९७ हजार ६५५
 • उपचार सुरू : १६ लाख ३५ हजार ९९३
 • एकूण मृत्यू : ३ लाख ४० हजार ७०२
 • करोना लसीचे डोस दिले गेले : २२ कोटी ४१ लाख ०९ हजार ४४८

लसीकरण मोहीम

देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान आतापर्यंत एकूण २२ कोटी ४१ लाख ०९ हजार ४४८ लसीचे डोस देण्यात आले आहेत. यातील २८ लाख ७५ हजार २८६ लसीचे डोस गुरुवारी देण्यात आले.

शेतकऱ्यांचे खतावरील अनुदान व्यापारीच लुटतायत, खत खरेदीनंतर शेतकऱ्यांनी काय करावे, जाणून घ्या !

भारतात पार पडलेल्या चाचण्या

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं (ICMR)दिलेल्या माहितीनुसार, ३ जून २०२१ पर्यंत देशात एकूण ३५ कोटी ७४ लाख ३३ हजार ८४६ नमुन्यांची चाचणी करण्यात आलीय. यातील २० लाख ७५ हजार ४२८ नमुन्यांची करोना चाचणी कालच्या एकाच दिवसात करण्यात आली.

 • जून महिन्यातील करोनाबाधितांची संख्या
 • १ जून : १,३२,७८८
 • २ जून : १,३४,१५४
 • ३ जून : १,३२,३६४
 • जून महिन्यातील मृत्यूसंख्या
 • १ जून : ३२०७
 • २ जून : २८८७
 • ३ जून : २७१३

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here