बिजवडी (जि. सातारा) : कोरोनाचा मागील वर्षभर खेळ खेळणारे सरकार आता कोरोना लस घेण्यासाठी परत एकदा कोरोनाची लाट आल्याचे नाटक करून देशवासियांना फसवत आहे.
कोरोनाची कल्पना बिल गेट्सच्या डोक्यांतून निर्माण झाली असून, भारतासह अनेक देश बिल गेट्सची खेळणी आहेत. हे जगातील अनेक तज्ज्ञ ओरडून सांगत आहेत, तरीही लोकांच्या डोळ्यांत धूळ फेकणे सुरू आहे.
कोरोना सारखे पेंडमीक आजार येतील असे गेट्स 2016 साली म्हणाला होता. त्यानंतर त्याने भारतासह अनेक देशात आपल्या विचाराचे सरकार आणले. बिल गेट्सने विषाणूचे पेटंट कसे काय घेतले? असा सवालही कऱ्हाडकर यांनी उपस्थित केला आहे.
त्यामुळे कोरोना हा विषाणू नसून दहशत आहे. हे भारतीय माणसापुढे सर्वात मोठे संकट असल्याचे धाडसी विधान हभप बंडातात्या कऱ्हाडकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले.
ते म्हणाले, देशात दर वर्षी कॅन्सरने मरणाऱ्यांची संख्या सरकारी माहितीनुसार साडेसात ते आठ लाख आहे. दारू पिऊन मरणाऱ्यांची संख्या अडीच लाख आहे असे असताना फक्त बनावट कोरोनाने मरणाऱ्या रुग्णांची संख्या वाढवून सांगितली जाते. तंबाखू, तंबाखूजन्य व अन्य मादक पदार्थांचे उत्पादन, विक्री व सेवनावर कोणतेही बंधन नाही.
यावरून सरकार दांभिक आहे, हे सिद्ध होते. कोरोनाला नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोरोनाची लक्षणे ताप, थंडी, सर्दी, कफ, खोकला अशी सामान्य असून, तो जीवघेणा रोग नाही.
त्यावर आयुर्वेदात शेकडो उपाय आहेत; पण सरकार त्या उपायांना प्राधान्य देत नाही. कारण ही औषधे बिल गेट्सची नाहीत. सरकारला नागरिकांना लुटून बिल गेट्सची सेवा करावयाची आहे. त्याचा मोठा मोबदला देशातील अनेक लोकांना मिळाला आहे, असेही ते म्हणाले आहेत.