आम्हाला ‘यावरून’ शिवसेनेने सल्ला देऊ नये’ काँग्रेसचे खडे बोल

192
Ashok Chawan-Sanjay Raut

 

मुंबई : खासदार शरद पवार यांना युपीएचे अध्यक्ष मिळणार याबाबत चर्चा रंगली होती. खासदार शरद पवार यांचा युपीएमध्ये मोठं स्थान आहे.

महाराष्ट्रात फक्त किमान समान कार्यक्रमावरूनच शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे युपीएच्या नेतृत्वाबाबत शिवसेनेने सल्ला देऊ नये, असे उत्तर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहे.

याचबरोबर ते युपीएचे (UPA) मूख्य नेत्यांमधील एक असल्याने त्यांना युपीएचे अध्यक्षपद द्यावे अशी मागणी शिवसेनेने केली. यावर राज्यात वेगवेगळे सुरू उमटत आहेत.

दरम्यान युपीएच्या अध्यक्षपदावरून शिवसेनेने काँग्रेसला सल्ला दिला होता. युपीएचे अध्यक्षपद शरद पवार यांच्याकडे द्यावं, असे शिवसेनेने सांगीतले होते. यावर काँग्रेस प्रत्युत्तर दिले आहे.

शिवसेनेने दिलेल्या या सल्ल्याला काँग्रेसने प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्रात किमान समान कार्यक्रमावरून शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे. शिवसेना हा पक्ष युपीएमध्ये सहभागी नाही.

काय म्हणाले होते संजय राऊत?

शरद पवार जर युपीएचे अध्यक्ष झाले तर आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. पण मला अशी कोणतीही शक्यता दिसत नाही. शरद पवारांनीही हे वृत्त नाकारलं आहे. शरद पवार महाराष्ट्राचे, देशाचे खूप मोठे नेते आहेत.

त्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे काम करत आहोत. पण जेव्हा युपीए अध्यक्षपदाबाबत आपण बोलत आहोत तेव्हा तसा कोणाताही प्रस्ताव अद्याप आलेला नाही.

जर शरद पवारांनी स्वत: हि गोष्ट सांगितली असेल तर त्यावर चर्चा करणे योग्य नाही. आम्ही तर नेहमीच हितचिंतक राहिलो आहोत. जर असा कोणता प्रस्ताव आला तर त्याचं समर्थन करु, असे संजय राऊत म्हणाले होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here