राज्यात मंत्रिमंडळ नसून खंडणीखोराचे मंडळ बसलेले आहे !

429
Devendra fadnvis

महाराष्ट्रात रेमडिसिव्हर इंजेक्शन येण्यासाठी मंत्र्यांना टक्के मोजावे लागतात का? फार्मा कंपनीच्या मालकाला धमकीचा फोन करणारा OSD कोणत्या मंत्र्यांचा होता?

मी, कालच पोस्ट लिहली होती, महाराष्ट्रात रेमडिसिव्हर का उपलब्ध होत नाहीत? मी, ज्या शंका उपस्थित केल्या होत्या त्याच खऱ्या ठरल्या आहेत.

काल दुपारी आणखी एक पोस्ट लिहली होती की, BJP Maharashtra एक लाख रेमडिसिव्हर खरेदी करून रुग्णाना देणार. या पोस्टमध्ये मी प्रश्न देखील केला राज्य सरकारला की, जे राजकीय पक्ष करू शकतो ते ठाकरे सरकार का करत नाही? तर ठाकरे सरकार रेमडिसिव्हर का खरेदी करत नाही? याचं उत्तर महाराष्ट्र झोपेत असताना मध्यरात्री कळलं.

दमन येथील ब्रूक्स फार्मा कंपनीला काल राज्यातील भाजपचे नेते Pravin Darekar – प्रविण दरेकर आणि आमदार Prasad Lad प्रकाश लाड यांनी भेट देऊन त्यांना एक लाख रेमडिसिव्हर महाराष्ट्रासाठी दिली. काही तांत्रिक अडचणी होत्या त्यात गुजरात FDA ची परवानगी व महाराष्ट्र FDA ची इत्यादी बाबी पूर्ण करून हव्या होत्या.

विरोधीपक्षनेते Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस हे स्वतः यात लक्ष घालून सर्व कायदेशीर सोपस्कार पार पाडले. व कंपनी सोबत केंद्र सरकारने टायप करून दिला की, ब्रूक्सफार्मा कंपनीचा रेमडिसिव्हर चा सप्लाय हा महाराष्ट्राला करावा.

रेमडिसिव्हर चा 1 लाख रेमडिसिव्हर इंजेक्शन घेऊन येण्याआधीच महाराष्ट्र सरकार मधल्या मंत्र्यांचा OSD पण, ब्रूक्स फार्मा कंपनीच्या मालकाला फो करून धमकी देतो की, देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्या सांगण्यावरून तू रेमडिसिव्हर का घेऊन येतो महाराष्ट्रात? तुला कोणी सांगितलं रेमडिसिव्हर देयला? अश्या प्रकारे धमकी देतो.

महाराष्ट्रात रेमडिसिव्हरची नितांत गरज आहे रेमडिसिव्हर साठी नातेवाईक भटकत आहेत, आणि रुग्ण दगावत आहेत. ठाकरे सरकारकडून कोणतीही हालचाल होत नाही. खरेदी करण्याची प्रक्रिया थांबवली आहे. प्रचंड तुटवडा जाणवतं आहे. कोणत्याही परिस्तिथीत माणसं जगली पाहिजे हा हेतू ठेवून राज्याच्या विरोधी पक्षाने पुढाकार घेऊन स्वतःच्या खर्चाने रेमडिसिव्हर उपलब्ध करून देत आहेत.

पण, सरकारच्या अन्न व औषधं प्रशासन मंत्रालयाला हे पचल नसणार. कारण ; यांच्या टक्क्यांवर पाणी फिरवलं जात आहे. म्हणून कोणत्या तरी मंत्र्यांच्या OSD ने फार्मा कंपनीच्या मालकाला घरी 10 पोलिस जवानांना पाठवून फार्मा कंपनीच्या मालकाला ताब्यात घेयला लावल. सेम अर्णव प्रकरणात जसे पोलीस गेले अटक करायला तसं यांच्या घरी दहा पोलिसांना पाठवलं. करायचं काही नाही फक्त घाबरून टाकायचं.

ताब्यात घेऊन ब्रूक्स कंपनीच्या मालकाची ना चौकशी ना काही फक्त बसवून ठेऊन मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात आला. जेंव्हा घटना देवेंद्रजी फडणवीस, प्रवीण दरेकर जी आणि प्रसाद लाड यांना कळली तेंव्हा तिघा नेत्यांनी सरळ पोलीस स्टेशन गाठले का त्यांना ताब्यात घेतल? अस प्रश्न विचारल्यावर पोलिसांची देखील बोबडी वळली. सर्व कायदेशीर पेपर असताना तुम्ही का ताब्यात घेतल? त्यावर पोलिसांनी थातूर मातूर उत्तर देण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी संगीतल की आम्ही यांना अटक केली नव्हती फक्त चौकशी साठी बोलवलं होत, त्यावर प्रवीण दरेकर यांनी पोलिसांना प्रश्न केला की, दहा पोलीस त्यांच्या घरी पाठवून तुम्ही त्यांना चौकशीसाठी बोलवलं का? हा सर्व तमाशा मध्यरात्री बिकेसी पोलीस स्टेशनमध्ये चालू होता.

हा सर्व प्रकार “त्या” मंत्र्यांच्या OSD च्या सांगण्यावरून होत होता. फार्मा कंपनीच्या मालकाला ताब्यात घेऊन राज्यसरकार चा हेतू काय होता? रेमडिसिव्हर इंजेक्शन हे जिलेटीन च्या कांड्या ठेवून घेयचं होते का? फार्मा कंपनीच्या मालकाला ताब्यात घेऊन खंडणी मागायची होती का? ज्या फार्मा कंपनीने महाराष्ट्रासाठी रेमडिसिव्हर इंजेक्शन देण्यासाठी पुढाकार घेतला तो टक्के देत नाही म्हणून त्याला ताब्यात घेऊन टॉर्चर करायचं होतं? हे सर्व प्रश्न आता जनतेच्या मनात येत आहेत.

राज्य सरकार कडून रेमडिसिव्हरचा तुटवडा दूर होत नाही. आणि राज्य सरकार त्यासाठी कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाही. आणि कोणी घेऊन उपलब्ध करून देत असेल तर त्यात आडकाठी आणून सप्लायरला धमकी देणे याचा अर्थ काय घेयचा लोकांनी? सरकारच्या मनात काय आहे? महाराष्ट्रातील जनतेला मरण्याच्या दाढेत ढकलून राज्य सरकारला फक्त रंगदारी वसूल करायची आहे का?

काल अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्रावर खोटे आरोप करत होते. आज त्यांच्याच मंत्रिमंडळात असलेल्या मंत्र्यांच्या OSD ने फार्मा कंपनीच्या मालकाला धमकी देत होता, जी कंपनी महाराष्ट्राला रेमडिसिव्हर देत आहे. या OSD चा अधिकार काय? याचा संबध काय? तो OSD कोण आहे? आणि मंत्री कोण आहे? हे सर्व माहिती आहे. ज्यावेळी योग्य वेळ येईल या दोघांची नावे जनतेसमोर आणणार.

महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन आहे की, राज्यात मंत्रिमंडळ नसून खंडणीखोराचे मंडळ बसलेले आहे. तुमच्या जीवाची तमा त्यांना नाही. त्यांना फक्त टक्के हवे आहेत. मेलेल्या लोकांच्या टाळूवरचा लोणी खायचं आहे.

प्रकाश गाडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here