देशात डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे कोरोनाची तिसरी लाट? तज्ज्ञांकडून महत्त्वाची ‘दिलासादायक’ माहिती

234
coroana

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या (Corona Virus) दुसऱ्या लाटेने (Second Wave) थैमान घातले होते. या लाटेने पुरते जनजीवन विस्कळीत केले होते, त्यातून अजून सामान्य सावरला नाही. तोच तिसऱ्या लाटेचा (Third Wave) धोका निर्माण झाला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य व्यवस्थेचा बराच बोजवारा उडालेला दिसला. या लाटेत सरकार अक्षरशः हतबल झालेले पाहायला मिळाले. सरकारने कितीही तयारी केली तरी ती तोकडी पडत होती.

आता दुसरी लाट ओसरत असतानाच डेल्टा प्लस या व्हेरिएंटनं (Delta plus variant) डोके वर काढले आहे. या व्हेरिएंटचे देशभरात 40 रुग्ण (India on Wednesday Confirmed 40 Delta Plus Cases) आढळून आलेत. त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत.

महाराष्ट्र, केरळसह इतर राज्यांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं अलर्ट जारी केला आहे. त्यातच आता डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे तिसरी लाटेचा धोका असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.

सर्वसामान्यांची पहिल्या व दुसऱ्या लाटेत लावलेल्या लॉकडाऊनमूळे आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. आता लॉकडाऊन म्हटले तरी हवालदिल होऊ लागला आहे.

सामान्य माणसाच्या मनात आता तिसऱ्या लाटेची भीती निर्माण झाली आहे. यावर आता तज्ज्ञांनी दिलासादायक खुलासा केला आहे.

डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे तिसरा लाट येण्याची शक्यता आहे, यासंबंधीचे अद्याप कोणतेही पुरावे नसल्याचे तज्त्रांनी म्हटले आहे.

देशातील सर्वोच्च जीनोम सिक्वेंसर यांचे म्हणणे आहे की, कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे तिसरी लाट येणार असल्याचा कोणताही पुरावा सध्या तरी समोर आला नाही.

दिव्य भास्करच्या वृत्तानुसार, इन्स्टिट्यूट ऑफ जेनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी (IGIB)चे संचालक डॉ. अनुराग अग्रवाल म्हणाले की, कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही याची काळजी आपण बाळगली पाहिजे.

देशातील बर्‍याच भागात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळलेत. मात्र देशातील टॉप डॉक्टर आणि जीनोम सिक्वन्सर्सनी अशी भीती निराधार असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या या नवीन व्हेरीअंटचा तिसर्‍या लाटेशी काही संबंध नाही.

NDTV ने डॉ. अनुराग अग्रवाल यांची विशेष मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत डेल्टा प्लस व्हेरिएंट आणि भारतातील परिस्थितीवर चर्चा करण्यात आली आहे.

या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, तिसऱ्या लाटेची आतापासून काळजी करण्यापेक्षा आपण दुसऱ्या लाटेवर लक्ष द्यायला हवे. देशातील दुसरी लाट अजूनही संपलेली नाही.

दुसरी लाट आता ओसरत आहे. मात्र या गंभीर परिस्थितीत निष्काळजीपणा करु नये. त्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे तिसरी लाट येऊ शकते, याबाबतचे अद्याप कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. त्यामुळे सद्य परिस्थिती पाहता दुसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी कोरोनाच्या नियमांचे पालन काटेकोरपणे करणं गरजेचे आहे.

डॉ. अग्रवाल यांनी म्हटले की, आपल्याला अजूनही सतर्क राहावे लागेल. सर्व कोरोनाचे नियम पाळावे लागतील. अद्याप कोरोनाची दुसरी लाट संपलेली नाही. त्यामुळे ही सर्वात मोठी चिंता देशासमोर आहे, सोबतच डेल्टाचा कोणताही व्हेरिएंट भारतासाठी चिंतेचा विषय असल्याचेही ते म्हणालेत.

नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे कोरोनाचे संकट वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान सध्या असलेला डेल्टा प्लस व्हेरिएंट डेल्टा पेक्षा धोकादायक आहे किंवा या व्हेरिएंटमुळे तिसरी लाट येऊ शकते असं कोणतेही पुरावे नाहीत, असेही डॉ. अग्रवाल यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here